मुंबई, 12 मे: पाच राज्यातील निवडणुकांचे (Assembly Election Result 2021) निकाल लागल्यानंतर देशभरातील इंधनाचे दर (Petrol-Diesel Hike) वाढत असल्याच चित्र आहे. तोपर्यंत दर अनेक दिवस स्थिर होते. सध्या काही शहरात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे तर काही शहरात पेट्रोल शंभरीच्या वाटेवर आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांवर टीका केली आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच! हे काय वित्त नियोजन आहे का? असा सवाल पाटील यांनी केला आहे. कोरोना परिस्थितीत देशात आणि राज्यात वाढलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत (Petrol Price Today) 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत (Diesel Price Today) 82.61 रुपये प्रति लीटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे सत्रव सुरूआहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 रुपये तर डिझेल 90.68 रुपये प्रति लीटर या दराने विक्री केली जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 98.36 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 89.75 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.
(हे वाचा- ‘सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’ नाना पटोलेंचा राऊतांना टोला ) दरम्यान महाराष्ट्रासह संपूर्ण देशात होणाऱ्या या इंधन दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत केंद्रीय अंर्थमंत्रालयावर टीका केली आहे. ‘केंद्रीय अर्थमंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा’, असं मत जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.