JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalgaon Crime : जळगावात गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

Jalgaon Crime : जळगावात गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

या गुन्ह्याचा खटला जळगाव न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालवण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 18 सप्टेंबर : जळगाव (Jalgaon Crime) शहरातील गोलाणी मार्केट येथे 10 वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जळगाव शहरात भिक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या 10 वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीवर सौरभ वासुदेव खर्डीकर याने 10 जुलै रोजी शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड केला आला होता.

या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालवण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले.

संबंधित बातम्या

हे ही वाचा :  6 वर्षाच्या मुलीसह महिलेची टेरेसवरुन उडी घेत आत्महत्या; पती म्हणाला ‘3 दिवसांपासून बोलत होती हे एकच वाक्य’

यात 10 वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीची साक्ष व रेखाचित्र काढणारे चित्रकार आणि वैद्यकीय अधिकारी तसेच सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाच्या ठरल्या. साक्षीपुराव्या अंती न्यायालयाने सौरभ खर्डीकर याला दोषी ठरवत विविध कलमान्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि 70 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या उत्रे गावामध्ये सचिन अरुण पाटील (वय 33) याने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Kolhapur Crime) दरम्यान या घटनेने पन्हाळा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. वारंवार अशा घटनामध्ये वाढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जाहिरात

दरम्यान पीडित मुलीच्या आईने पन्हाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सचिन पाटील याच्याविरुद्ध बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करून याला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा :  VIDEO : हॉस्टेलमधील 60 तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS व्हायरल, 8 जणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न; विद्यापीठात मोठा गोंधळ

संशयित पाटील याचे कोतोली येथे हॉटेल आहे. तो व पीडित मुलगी एकाच गावचे रहिवासी आहेत. संशयिताची पीडित मुलीच्या घरी येत होती. याचा गैरफायदा घेऊन संशयित पाटील याने पीडित मुलीशी जानेवारी ते मार्च 2022 या काळात वेळोवेळी संबंध ठेवल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या