JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jalgaon Crime : अजमेरचा बाबा पावत असल्याचे सांगून दाम्पत्याने लाखो रुपये लुटले

Jalgaon Crime : अजमेरचा बाबा पावत असल्याचे सांगून दाम्पत्याने लाखो रुपये लुटले

जळगावात अंधश्रद्धेच्या अघोरी कृत्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. सामान्यांच्या धार्मिक भावनांशी खेळ करत पैशाची लूट करण्याचे प्रकार घडत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 05 ऑक्टोंबर : जळगावात अंधश्रद्धेच्या अघोरी कृत्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. सामान्यांच्या धार्मिक भावनांशी खेळ करत पैशाची लूट करण्याचे प्रकार घडत आहेत. जळगावात असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगितले. तुमच्या घरात भूतबाधा व आत्म्याचा वास आहे. ती भुताटकी दूर करण्यासाठी खर्च असल्याचे सांगत जळगावातील एका दाम्पत्याला भोंदूबाबाने तब्बल 11 लाखात लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये एक भोंदुबाबा फिरत आहे ते घरातील भुताटकी आत्म्याचा वास असल्याचे सांगून फसवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. घरात सुखशांती नांदावी, घरातील व्यक्तीने केलेल्या आत्महत्येमुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळवावी म्हणून तो भिती घालत असे.  

हे ही वाचा : किती भयानक आहे हे सगळं! मुंबईत चोरटे बिनधास्त घरात शिरतात, दागिने-पैसे चोरुन नेतात

संबंधित बातम्या

दरम्यान होमहवन यासह इतर कारणं व अघोरी शक्तीची भीती घालून जळगाव शहरातील दाम्पत्याला ललीत हिमंतराव पाटील व त्याची पत्नी महिमा उर्फ मनोरमा पाटील (रा. पिंप्राळा) या भोंदू दाम्पत्याने तब्बल 11 लाख ३२ हजार रुपयांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे भोंदू बाबाचे पितळ उघडे पडले आहे. या भोंदू दाम्पत्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात फसवणूक, महाराष्ट्र नरबळी, जादूटोणा, इतर अमानुष व अघोरी प्रथाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

जाहिरात

जळगाव येथे राहणारे दांपत्य कोरोना काळात तणावात होते. या दाम्पत्याच्या पत्नीला तिची कॉलेजची मैत्रीण मोहिनी हिने माझ्या घरी ये. माझे पती यावर काहीतरी उपाय करतील असे सांगितले. सावखेडा शिवार येथील मेरा घर अपार्टमेंटमध्ये गेल्यावर ललित पाटील यांनी सांगितले की, नुकताच मृत झालेल्या दिराचा आत्मा तूझ्या अंगात घुसला आहे. त्या आत्म्याचे घरावर प्रेम असल्याने त्याची शांती केल्याशिवाय घरातील ही बाधा दूर होणे अशक्य आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  तेलही गेलं, तूपही आणि हाती आलं धुपाटणं, वसईत व्यापाऱ्याला कोट्यवधींचा चुना

ओळखीचा फायदा घेत महिमा पाटील हिने आपल्या पती ललित अघोरी पुजा करतो. त्याच्या अंगात अजमेरचा पीर येतो. असे सांगत विश्वास संपादन केला. पूजा विधीसाठी या दाम्पत्याकडून 11 लाख 32 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने व रोख असे घेतले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित दाम्पत्य पोलिसात गेल्यास मी अघोरी शक्तीने तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन. पैसे परत मागू नका अशी धमकी भोंदू बाबाने दिली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या