INS वागीर पाणबुडी
मुंबई, 23 जानेवारी : भारतीय नौदलाच्या सेवेत आज INS वागीर ही पाणबुडी दाखल होत आहे. मुंबईच्या माझगाव गोदीत नौदलाच्या परंपरेप्रमाणे INS वागीर ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. भारतीय नौदलात सायलेंट किलर म्हणून INS वागीरची ओळख आहे. प्रोजेक्ट 75 ची फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली INS वागीर ही पाणबुडी, शत्रू देशांच्या नौदलांना छातीत धडकी भरवणारी कामगिरी करण्याची क्षमता ठेवते. भारतीय बनावटीची आणि माझगाव गोदीत बांधण्यात आलेली INS वागीर ही कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे. वागीर पाणबुडीची वैशिष्ट्ये - 1) ‘साहस शौर्य समर्पण’ हे या INS वागीर पाणबुडीचे ब्रीदवाक्य आहे. 2) INS वागीर पाणबुडी प्रोजेक्ट 75 ची आणि कलवारी क्लासची ही पाचवी पाणबुडी आहे. 3) INS कलवरी, INS करंज, INS खंदेरी, INS वेला या चार पाणबुडी नौदलात दाखल होऊन सायलेंट किलर म्हणून काम करत आहेत. 4) INS वागीरच्या निर्मितीला 2018 पासून सुरुवात झाली. त्यानंतर 2022मध्ये या पाणबुडीचं जलावतरण झालं आणि डिसेंबर 2022 मध्ये सर्वच समुद्री सशस्त्र चाचण्या या पाणबुडीने यशस्वीरित्या पार करून आता ही नौदलात दाखल होत आहे. 5) या पाणबुडी मध्ये फ्रेंच तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापर करून शत्रूला सावध न करता प्रहार करणारी ही INS वागीर पाणबुडी आहे. 6) INS वागीर मध्ये 1250 किलो वॅट चे 2 डिझेल इंजिन तर 350 बॅटरी आहेत. डिझेल इंजिनद्वारे बॅटरी चार्ज करण्याचे त्यासोबत आतील हवा बाहेर फेकण्याचा व आतमध्ये हवा खेळती ठेवण्याचं काम केलं जातं. हेही वाचा - Success Story : पाणीपुरी विकून मुलाला बनवले पायलट, रविकांतचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी! 7) स्टेल्थ टेक्नॉलॉजी मुळे शत्रूला चकवा देता येतो आणि त्याच्यावर हल्ला करणं सहज शक्य होतं. 8) INS वागीर पाणबुडीची लांबी 67.5 मीटर तर उंची 12.3 मीटर इतकी आहे. 9) INS वागीर पाणबुडी न थांबतां समुद्रात 12 हजार नॅाटिकल्स माईल्स पर्यत प्रवास करू शकते. 10) INS वागीर ४५ ते ५० दिवस समुद्राच्या आत ३५० मीटर पर्यत सुरक्षित राहू शकते. 11) INS वागीर पाणबुडीवर 18 टॉरपिडो ट्यूब आहेत. 12) INS वागीर मुळे भारतीय नौदलाची खोल समुद्रातील ताकत वाढलीय.