JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुत्रप्राप्तीसाठी महिलेसोबत अघोरी प्रकार, पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

पुत्रप्राप्तीसाठी महिलेसोबत अघोरी प्रकार, पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा फासणारा एक प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यात घडल्याचं पाहायला मिळालं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदापूर, 29 जून : जग आधुनिकतेकडे जात असल्याचं सगळीकडेच बोललं जातं. मात्र आजही आपल्या समाजात काही ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहेत. असाच एक प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यात घडल्याचं पाहायला मिळालं. मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन वारंवार मानसिक छळ करुन मांत्रिकाकडून जादूटोना करुन त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पती, सासू-सासरा आणि दोन मांत्रिकाविरुद्ध जादूटोना प्रतिबंधक कायद्यान्वये भिगवण पोलिसात पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनर ट्रक उलटला, 2 जण गंभीर जखमी याबाबत मिळालेली माहिती अशी की, भिगवण येथे 23 जूनला भर दुपारी 12 वाजता भिगवण-बारामती रोडलगतच एक मांत्रिक, दोन वयस्क माहिला व पीडितेचे पती यांनी 22 वर्षीय माहिलेला जबरदस्ती तरवडाच्या झाडाखाली बसवून अंगावर पाणी ओतून ओल्या अंगावर, डोक्यावर, खांद्यावर, गुडघ्यावर लिंबे कापली. तसंच केसांची बट उपसून त्यावरही काही धागे बांधले व हात जोडून बसून रहावयास सांगितले. याप्रकरणी आता अखेर पीडित महिलेने भिगवन पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या