राहुल खंदारे, प्रतिनिधी
बुलढाणा, 21 ऑगस्ट : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 रुग्णवाहिकेवर एक डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. आकस्मित सेवेसाठी असलेल्या 108 रुग्णवाहिकेवरील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर ओमप्रकाश सूर्यवंशी हे एका गंभीर रुग्णाला घेण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा अचानक धावत्या रुग्णवाहिकेत मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या महितीनुसार, डॉ. सूर्यवंशी यांना एका रुग्णाचा फोन आला. ते रुग्णवाहिका चालक यांना घेऊन रुग्णाच्या घरी जात असताना धावत्या रुग्णवाहिकेत त्यांची तब्येत अचानक बिघडली. तात्काळ रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान ठेऊन त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयात आणले. पण तोपर्यंत डॉ.सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. ही माहिती सदर रुग्णवाहिका संचालन करणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
हे ही वाचा : MLA Bachchu Kadu : बच्चू कडूंची नाराजी उघड; कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि नवनीत राणांपुढे सरकारला विचारला जाब
पण 12 तास उलटून गेल्यावरही संबंधित कंपनीचे जिल्ह्याचे प्रबंधक अजिंक्य लवंगे यांनी अजूनही याठिकाणी भेट न दिल्याने डॉ.ओमप्रकाश सूर्यवंशी यांचे नातेवाईक व 108 रुग्णवाहिकेचे चालक व डॉक्टर्स यांनी संताप व्यक्त केला. जो पर्यंत भारत विकास ग्रुप कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. भारत विकास ग्रुप कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तणावाला डॉ. सूर्यवंशी बळी पडल्याचा आरोप यावेळी कर्मचारी करत होते. मात्र त्याची समजूत घालून त्यांना मृतदेह ताब्यात देण्यात आला.
बुलढाण्यात तीन जणांवर हल्ला
बुलढाणा शहरात पैशाच्या वादातून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. यात तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. एकावर बुलढाणा शहरात खाजगी रुग्णालयात तर दोन जणांना पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. पैशाच्या वादातून झालेल्या हल्ल्यानंतर या मारहाणीत हा चाकू हल्ला करण्यात आला आहे. यातील तीनही आरोपी पळून जात असताना बुलढाणा शहर पोलिसांनी विविध पथकाच्या मार्फत सिनेस्टाईल पद्धतीने मध्यरात्री या तीनही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा : Wardha Farmer Suicide : केंद्रीय पथक, फडणवीस, सगळे आले पण मदत नसल्याने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल