JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जयंत पाटील, खडसेंनी पाठ फिरवताच शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

जयंत पाटील, खडसेंनी पाठ फिरवताच शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली.

जाहिरात

जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इम्तियाज अली, प्रतिनिधी मुक्ताईनगर, 28 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिंदे गटामध्ये (shinde group ) जोरदार इन्कमिंग सुरू आहे. आता याचा फटका राष्ट्रवादीला सुद्धा बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) मुक्ताईनगरमधून दौरा करून परतत नाही, तेच शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा प्रकार घडला आहे. जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे सुद्धा हजर होते. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पण, या बैठकीनंतर नेत्यांनी पाठ फिरवताच कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची वाट निवडली. राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहे. शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास सारोळा, रिगाव येथील शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. जयंत पाटील शिवसेनेवर नाराज दरम्यान, राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जयंत पाटील यांनी शिवसेनेबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘महाविकास आघाडीमध्ये समविचारी जे वेगवेगळे पक्ष आहेत ते आमच्या बरोबर आहेत आणि सर्व मिळून आम्ही काम करत आहोत. मात्र शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी केलेल्या युतीबाबत आजच माहिती मिळाली. त्यात काही वावगे वाटत नाही मात्र शिवसेना कोणाशी युती करत असेल तर याबाबत भविष्यात चर्चा होईल’ अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. मिळणार काहीच नाही, फक्त छळ सुरू - एकनाथ खडसे तर, भोसरी भूखंड प्रकरणी पुणे अँटी करप्शन विभागाच्या वतीने नव्याने चौकशीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे . याबाबत एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी अनेक चौकशा झाल्या अँटीकरप्शन विभागाच्या वतीने देखील दोन वेळा चौकशी करून 18 महिन्यांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. असं असताना अँटी करप्शन कडून पुन्हा नव्याने चौकशीची करून यात काय तथ्य काढणार आहे, असा सवाल एकनाथ खडसे यांनी यावेळी उपस्थित केला. हा केवळ छळ करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला. ‘मी जेल मध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहे. आता सीबीआय चौकशी सुरू केली आहेत. सगळ्या चौकशा लावल्या आहेत. जर काही केले नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. एक रुपयाचे भ्रष्टाचार केला नाही,केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, मात्र तुम्ही खोदा जेवढं खोदायच आहे मात्र काही मिळणार नाही, हे सरळ लढू शकत नाही, त्यामुळे अशा पध्दतीने बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत खडसे यांनी विरोधकांना आव्हान दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या