JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Holi Guidelines: होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम

Maharashtra Holi Guidelines: होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम

Holi 2022: होळी आणि धुळवड साजरी करण्यासाठी राज्य सराकरकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

जाहिरात

Maharashtra Holi Guidelines: होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मार्च : कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे आणि त्यामुळे निर्बंधही कमी झाले आहेत. निर्बंध कमी झाल्याने नागरिक आता मोठ्या उत्साहात होळी (Holi), धुळवड (Dhulivandan / Dhulvad) साजरी करण्याचा बेत आखत आहेत. तुम्हीही तसाच बेत आखत असाल तर मग जर थांबा. कारण, होळी आणि धुळवड साजरी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या गृह खात्याकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली असून त्या संदर्भातील नियमांचे पालन नागरिकांना करावेच लागणार आहे. (Maharashtra government issued guidelines for celebration of holi rangpanchami) या नियमावलीनुसार, रात्री 10 वाजल्यानंतर होळी साजरी करता येणार नाहीये. तसेच डीजे लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळेच डीजे न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होळी आणि रंगपंचमी / धुळवड साजरी करत असताना मद्यपान करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. रंगपंचमी किंवा धुळवड साजरी करत असताना अनेक ठिकाणी खासकरुन शहरी भागात रंगांच्या पाण्याने भरलेले फुगे किंवा पिशव्या मारल्या जातात. मात्र, असे करत असताना अनेकदा दुर्घटनाही घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच यंदा धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाचा :  होळीच्या दिवशी दिसाल स्मार्ट आणि स्टाईलिश; पुरुषांनी फॉलो करा हे हटके फॅशन ट्रेंड अशी आहे राज्य सरकारची नियमावली रात्री 10 वाजण्याच्या आत होळी करावी 10 वाजण्याच्या आधी होळी लावणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतर परवानगी नसणार होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी असणार होळी साजरी करताना डीजे लावल्यास कायेदशीर कारवाई होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे लाऊड स्पीकर जोरजोरात न लावण्याच्या सूचना धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत. कुठल्याही जाती किंवा धर्माच भावना दुखावल्या जातील अशा घोषणा देऊ नये होळी आणि रंगपंचमी कधी? यंदाच्या वर्षी होळी 17 मार्च रोजी आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 मार्च रोजी रंगपंचमी आहे. तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाच दिवसांनी धुळवड साजरी करण्यात येत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या