JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / Weather Update: राज्यात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा; कधी थांबतील कोसळधारा?

Weather Update: राज्यात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा; कधी थांबतील कोसळधारा?

IMD ने पुढील 48 तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 8 जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची (Rain in maharashtra) शक्यता आहे. विजांसह होणारा हा पाऊस आणखी किती दिवस मुक्कामी असेल याविषयी हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

0110

राज्यात 4-5 दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसानं हजेरी लावली आहे.

जाहिरात
0210

उद्या जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे सात जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.

जाहिरात
0310

भारतीय हवामान खात्याने आज कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी केला आहे.

जाहिरात
0410

पुढील काही तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जाहिरात
0510

पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0610

राज्यात हळुहळू पावसाचा जोर कमी होणार आहे. तर विकेंडला पुन्हा राज्यातून मान्सून गायब होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0710

नागरिकांना हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जाहिरात
0810

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे.

जाहिरात
0910

येत्या काळात बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती मंदावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
1010

बंगालच्या परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्रामुळे येत्या 48 तासात तीव्रता कमी होण्याची शक्यता कमी होऊन ते ओडीशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या दिशेने पुढच्या 3 दिवसात सरकेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या