JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharahstra Rain : पुणे जिल्ह्यातील 355 शाळा आज आणि उद्या बंद

Maharahstra Rain : पुणे जिल्ह्यातील 355 शाळा आज आणि उद्या बंद

जाहिरात

पुणे जिल्ह्यात दरड प्रवण क्षेञातील झेडपीच्या 355 शाळा आज आणि उद्या बंद राहणार आहेत.  पुणे झेडपी सीईओ आयुष प्रसाद यांनी याबाबतची माहिती दिली

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Rain Live Updates : राज्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 1-2 दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी तर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान खात्याने आजही असाच पाऊस राहील, असा इशारा दिला आहे. 20 जुलैला ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट म्हणजेच अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाच्या या इशाऱ्यामुळे आज मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच स्थानिक प्रशासनाने तिथल्या परिस्थितीनुसार शाळांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

July 20, 2023, 11:02 am IST

ईर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

तर 21 जण जखमी

या गावातील लोकसंख्या 228 आहे

48 कुटुंबांची ही वाडी होती

57 लोकांना आतापर्यंत बाहेर काढलं आहे.

July 20, 2023, 10:31 am IST

पुणे जिल्ह्यात 355 शाळा आज आणि उद्या बंद

पुणे जिल्ह्यात दरड प्रवण क्षेञातील झेडपीच्या 355 शाळा आज आणि उद्या बंद राहणार
पुणे झेडपी सीईओ आयुष प्रसाद यांची माहिती
July 20, 2023, 10:24 am IST

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत

इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आर्थिक मदत

महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती

जाहिरात
July 20, 2023, 10:13 am IST

वाशिष्ठी ब्रिजवरचा भराव गेला वाहून

रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी ब्रिजवरचा भराव गेला वाहून
मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरच्या एका लेंथ वरचा भराव वाहिला
भराव भरला नाही तर वाशिष्ठीच्या पुलाला मोठा धोका
मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या ब्रिजवरचा हा भराव
नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे भराव गेला वाहून
July 20, 2023, 8:15 am IST

कोल्हापुरात मुसळधार पाऊस

कोल्हापुरात मुसळधार पाऊस

पंचगंगा नदीच्या पात्रात गेल्या 24 तासात 10 फुटांनी वाढ झाली

इशारा पातळीकडे नदीने वाटचाल सुरू केली आहे

July 20, 2023, 8:01 am IST

हवामान विभागाकडून आजही मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाकडून आजही मुसळधार पावसाचा इशारा
ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबईसाठी यलो अलर्ट

पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला

जाहिरात
  • First Published :

फोटो

महत्वाच्या बातम्या