मुंबई, 26 जुलै : राज्याच्या विविध भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. या मुसळधार पावसाने अनेक भागातील नद्यांची पाणी पातळी घटली आहे. तर पूरही ओसरला आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पाऊस चिंता वाढवणार असल्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील पावसासंदर्भात एक इशारा दिला आहे. हवामान खात्याने काय म्हटले - राज्यात पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज असताना संपूर्ण महिना कोरडा गेला होता, त्यानंतर जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्यभरात दमदार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसाळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - थेट नावं घेऊन.. या लोकांची हत्या कोणी केली? नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातले आहे. राज्यात कोकण आणि विदर्भात सध्या पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान कोकणातही पावसाचा जोर ओसरला असला तरी विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाने कित्येक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान मुंबई आणि पुण्यात पावसाची उघडझाप असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.