JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गणेशोत्सवात वरुणराजाचे धुमशान, पुढील काही तासात या ठिकाणी पावसाची तुफान फटकेबाजी

गणेशोत्सवात वरुणराजाचे धुमशान, पुढील काही तासात या ठिकाणी पावसाची तुफान फटकेबाजी

हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 सप्टेंबर : राज्यात गणेशोत्स्वाची धूम आहे. कोरोनामुळे मागील 2 वर्ष गणेशोत्सव नागरिकांना आपल्या मनाप्रमाणे उत्साहात साजरा करता आला नाहीत. मात्र, यावर्षी संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. त्यात आता गणेशोत्सवातही पुन्हा वरुण राजा बरसणार आहे. हवामान खात्याने याबाबतची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने काय म्हटले - रायगड, ठाणे, अहमदनगर भागात, तसेच पुणे, नाशिक जवळील मध्यम ते तीव्र मेघगर्जनेचे ढग दिसले. त्यामुळे पुढील 2 ते 3 तासांत या भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच मुंबईसह कोकणातही ढगांचा गडगडाट आहे. त्यामुळे याठिकाणीही पुढील 3-4 तासांत तुफान पावसासह मेघगर्जनेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. पावसाने आराम घेतल्याने राज्यातील पावसाळा लवकर संपणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण राज्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. विशेष म्हणजे राज्यभरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. या उत्साहात पावसाच्या रिमझिम सरींनी बरसत गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. हेही वाचा -  Shocking! गर्दी दिसताच वाढवला स्पीड, सर्वांना उडवत-चिरडत गेली कार; त्याच गाडीतून शूट केला VIDEO विशेष म्हणजे सुरुवातीला रिमझिम वाटणारा याच पावसाने आता आक्रमक रुप घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबतचा इशारा दिला आहे. विशेषत: मुंबईसाठी हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या