JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ambulance Accident : जीव वाचवण्यासाठी ह्रदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचाच अपघात पुढे जे घडलं ते...

Ambulance Accident : जीव वाचवण्यासाठी ह्रदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचाच अपघात पुढे जे घडलं ते...

कोल्हापूरमधून पुण्याकडे जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने 5 जण जखमी झाले. दरम्यान या रुग्णवाहिकेतून ग्रीन कॉरिडॉरमध्ये ह्रदय प्रत्यारोपणासाठी नेण्यात येत होते. (Ambulance Accident)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 1 सप्टेंबर : कोल्हापूरमधून पुण्याकडे जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने 5 जण जखमी झाले. दरम्यान या रुग्णवाहिकेतून ग्रीन कॉरिडॉरमध्ये ह्रदय प्रत्यारोपणासाठी नेण्यात येत होते. (Ambulance Accident) यामुळे ही रुग्णवाहिका जोरदार वेगाने जात असताना अचानक पुढच्या बाजूचा टायर फुटल्याने हायवेवरच ही रुग्णवाहिका कलंडली. यामध्ये दोन डॉक्टर आणि अन्य लोक होते. एकूण 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

कोल्हापूर येथून ग्रीन कॉरिडॉरमध्ये प्रत्यारोपणासाठी हृदय आणणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने रुग्णवाहिका कलंडली. ही घटना पुणे, सातारा मार्गावर किकवी येथे बुधवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोन डॉक्टर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी गावातील रुग्णवाहिका देऊन तातडीने जखमी डॉक्टरांना तसेच हृदय पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात पाठवल्याने एका रुग्णाचा जीव वाचला.

हे ही वाचा :  पैसे घेऊन परभणीतील मुलीचा जळगावात बालविवाह करण्याचा प्रयत्न, चागलं स्थळ आहे असे सांगत…

संबंधित बातम्या

पुण्यातील नामांकित रुबी हॉल रुग्णालयात बुधवारी हृदयाची गरज असलेल्या एका रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती. त्याकरिता डॉक्टरांनी आवश्यक त्या शस्त्रक्रियेची तयारी केली होती. यासाठी कोल्हापूर येथून एका दात्याने दिलेले हृदय हे दोन डॉक्टरांचे पथक रुग्णवाहिकेतून ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यात जलद गतीने घेऊन येत होते. ते कोल्हापूर येथून पुणे-बंगळुरू मार्गाने पुण्याच्या दिशेने येत असताना भोर तालुक्यातील किकवीजवळ या रुग्णवाहिकेचा पुढचा टायर अचानक फुटला.

जाहिरात

रुग्णवाहिका वेगात असल्याने ती महामार्गावरच कलंडली. यात रुग्णवाहिकेतील पाच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए नांदेड सिटी अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी तातडीने पोहोचली. त्यांनी मदतकार्य करत तातडीने आवश्यक ती मदत केली.

हे ही वाचा :  नारायण राणेंनी केली आदित्य ठाकरेंची उंदराशी तुलना, गणेशोत्सवात होणार ‘शिमगा’?

किकवी येथील नरेंद्र महाराज नाणीज या संस्थेची अॅम्ब्युलन्स व चालक तुळशीराम रघुनाथ अहिरे यांनी त्यांच्याकडील अॅम्ब्युलन्स देऊन कलंडलेल्या अॅम्बुलन्समधील हृदय व डॉक्टरांना घेऊन रुबी हॉल गाठला. त्यानंतर जखमींवर उपचार आणि हृदयरोपण शस्त्रक्रिया केली गेली. रुग्णवाहिकेचा अपघात होऊनही सुरक्षितरीत्या अवयवदान केलेले हृदय रुबी रुग्णालयात वेळेत सुस्थितीत पोहोचल्याने एका रुग्णाचा जीव वाचू शकल्याची महत्त्वपूर्ण घटना या अपघातानंतरही घडल्याचे पाहावयास मिळाले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या