JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांच्या मनातली खदखद अखेर आली बाहेर, चांगल्या खात्याचा मोह आवरेना

Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांच्या मनातली खदखद अखेर आली बाहेर, चांगल्या खात्याचा मोह आवरेना

चांगल्या खात्यासाठी थोडासा आग्रह पकडला असता तर याच्या पेक्षाही चांगलं खातं मला मिळालं असतं असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 02 ऑक्टोंबर : चांगल्या खात्यासाठी थोडासा आग्रह पकडला असता तर याच्या पेक्षाही चांगलं खातं मला मिळालं असतं असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्यातील फुलगाव येथे पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी केली आहे. पण जे चाललंय ते चालू द्या असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे चांगल्या खात्याची अपेक्षा केल्याचे बोलले जात आहे.

तसेच आपल्या गावात सुरू केलेल्या योजनेवरून गुलाबराव पाटील यांनी पुढच्या वेळेस गाव मला मतदान करणार की नाही असा संशय व्यक्त केला. गावात पाण्यासाठी डायरेक्ट मिटर बसवल्याचे भाषणात बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे.

तर यावेळी मंत्री पाटील यांनी विरोधकांवरही निशाणा साधत काही लोक आमच्यात मध्ये मध्ये करतात ज्यांना ठराव माहिती नसतो तेसुद्धा आम्ही योजना मंजूर करून आणली असे सांगतात मात्र जन्माला बाळ आम्ही घालायचं आणि बारसं तुम्ही करायचं हा यांचा धंदा असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

हे ही वाचा :  मावळनंतर ‘पार्थ’ या मतदारसंघातून लढणार? राष्ट्रवादीच्या नेत्याची अजितदादांसमोरच मागणी

थापा आला आता मिलींद नार्वेकर येतील

मागच्या दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चम्पासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे मिलींद नार्वेकरही शिंदे गटात सामील होणार असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. पाटील हे धुळ्यातील सभेत बोलत होते.

जाहिरात

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले कि, मी 50 खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे हे मला मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तो देखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

जाहिरात

हे ही वाचा :  ‘त्याला कुठून अवदसा सुचली आणि…’, सासुरवाडीतच अजितदादांनी भाच्यावर डागली तोफ

गुलाबराव पाटलांचा ताफा अडवला

धुळ्यात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची गाडी शिवसैनिकांनी आडवण्याचा प्रयत्न केला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे दौऱ्यावर आले होते. शिंदे गटाच्या दसरा मेळावाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. धुळ्याकडे येत असताना पारोळा चौफुलीवर खोके दाखवत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या