JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : दहीहंडी बांधायला चढला, अन् शिडीवरुन थेट खाली कोसळला; डोक्याला जबर फटका

Video : दहीहंडी बांधायला चढला, अन् शिडीवरुन थेट खाली कोसळला; डोक्याला जबर फटका

कृष्ण जन्माष्टमीच्या सणाच्या दिवशी ठाण्यात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी दहीहंडी बांधली जात असताना संतोष शिंदे नावाचा तरुण शिडीवरुन चढला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 20 ऑगस्ट : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध ठिकाणी काल मोठ्या उत्साहामध्ये दहीहंडीचा सण साजरा करण्यात आला. मागील दोन वर्ष कोरोनामुळे दहीहंडी साजरी करण्यावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यावर्षी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आयोजक आणि गोविंदा पथकांमध्ये उत्साह दिसला आणि उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. मात्र, ठाण्यातून याचसंबंधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यात गोविंदा गंभीर जखमी गोविंदाची दहीहंडी बांधत असताना एक व्यक्ती जोरात रस्त्यावर पडला. यामध्ये या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. सध्या या व्यक्तीला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतोश शिंदे, असे या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती कसा खाली पडला, हे नेमके दिसत आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या सणाच्या दिवशी ठाण्यात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी दहीहंडी बांधली जात असताना संतोष शिंदे नावाचा तरुण शिडीवरुन चढून दहीहंडी पद्धतशीरपणे लावण्यासाठी तो हंडीपर्यंत पोहोचला. मात्र, याचवेळी ही शिडी चुकून खाली पडली. त्यामुळे संतोष शिंदे नावाचा हा व्यक्ती मोठ्या जोरात रस्त्यावर पडला. या घटनेता त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्यामुळे संतोष शिंदे यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

हेही वाचा -  VIDEO: फुलांची माळ धरू मद्यपी भरभर वर चढला अन् डोक्याने फोडली हंडी, गोविंदाही चक्रावले अनेक गोविंदा जखमी -  दरम्यान, दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना झालेल्या अपघातांमुळे सुमारे 138 गोविंदा जखमी झाले आहेत. हा आकडा केवळ मुंबई आणि ठाणे येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 111 तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी झाले. यापैकी 88 गोविंदांना वैद्यकीय उपचार करुन घरी सोडण्यात आले. तर इतर गोविंदांवर अजूनही उपचार सुरू आहेत. दरम्यान, दहीहंडीच्या उत्सवात काल राजकीय नेतेही मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. तसेच अनेक सिनेकलाकारांनी या दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेत गोविंदाचा उत्साह वाढविला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या