JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हप्ता देण्यास व्यापाऱ्याचा नकार; गावगुंडांनी फेकल्या घरावर बिअरच्या बाटल्या, घटना CCTV मध्ये कैद

हप्ता देण्यास व्यापाऱ्याचा नकार; गावगुंडांनी फेकल्या घरावर बिअरच्या बाटल्या, घटना CCTV मध्ये कैद

Crime News Marathi: घरावर बिअरच्या बाटल्या फेकून दहशत माजवण्याचा प्रयत्न गावगुंडांनी केला आहे. उल्हासनगरमधील घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उल्हासनगर, 15 सप्टेंबर : उल्हासनगरमधील (Ulhasnagar) गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता गावगुंडांनी एका व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला (attack on trader house) करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका व्यापाऱ्याच्या घरावर बिअरच्या बाटल्या फेकून दहशत माजवण्याचा प्रकार गावगुंडांकडून उल्हासनगर शहरात केला गेलाय. हा संपूर्ण प्रकार त्या परिसरातली सीसीटीव्हीमध्ये कैद (Incident Caught in CCTV) झाला आहे. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर चारमध्ये धिरज वलेच्छा या व्यापाऱ्यांचे दुकान आहे. तुझे दुकान चांगले चालत असून तू दर महिला दहा हजार रुपये दे, अशी व्यापारी वलेच्छा यांच्याकडे नविन केशवानी याने खंडणी मागितली. मात्र वलेचा याने त्याला नकार दिला.

संबंधित बातम्या

पुण्यात अल्पवयीन पोरं करताय हप्ता वसुली, दुकानदारावर कोयत्याने हल्ला, LIVE VIDEO पैसे देण्यास नकार दिला आणि याच रागातून केशवानी याने टोळीच्या मदतीने वलेचा याच्या घरावर मध्यरात्री हल्ला करत बिअर आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या फेकल्या. यात वलेचा यांच्या घराचे नुकसान झाले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर संबंधित व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नवीन केशवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या