JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Gondia Crime : कुणावर विश्वास ठेवायचं? घरी सोडून येतो म्हणत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Gondia Crime : कुणावर विश्वास ठेवायचं? घरी सोडून येतो म्हणत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गोंदिया शहरातील पाल चौक येथून घरी सोडून देण्याच्या नावाने एका 31 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रवि सपाटे (गोंदिया), 06 नोव्हेंबर : गोंदिया शहरातील पाल चौक येथून घरी सोडून देण्याच्या नावाने एका 31 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाने अल्पवयीन मुलीला घरी सोडून देतो म्हणून आपल्या दुचाकीवर बसवून नेले. तर तरुणाने स्वतःच्या घरी आवश्यक काम असल्याच्या सांगत आपल्या घरी घेऊन गेला. व घरी कुणीही नसल्याच्या फायदा घेत तीच्यावर अत्याचार केला. आणि कुणास काही सांगायचे नाही अशी धमकी दिली.

मात्र मुलीने झालेला प्रसंग आपल्या घरी आईला सांगितला, आईने तात्काळ गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. याबाबत ग्रामीण पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपी राजु डे (वय 31) असुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हे ही वाचा :  ‘तेरे बिना मरजावां…’ गाण्यावर रील बनवून शेअर केली, मग गर्लफ्रेंडच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

संबंधित बातम्या

आरोपी विरुद्ध कलम ३७६/२, ३४२ पॉस्को ४/१२/८ गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असून दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत गोंदियात संताप व्यक्त करण्यात आला.

बीडमध्येही अशाच घटनेने संताप

बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. प्रमोद सोमनाथ सलगर (रा. मुंगी ता. धारुर जि. बीड) असं नराधम आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जाहिरात

या विषयी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून, 13 वर्षीय पीडिता ही आजी आजोबांच्या घरी होती. (दि. 22) ऑक्टोबर रोजी आजी आजोबाच्या राहत्या घरातून, आरोपी प्रमोद सलगर याने पीडितेला पळवून नेले. यानंतर पिडीत मुलगीचा शोध घेण्यात पोलिसांना यश  आले.

हे ही वाचा :  बापरे! एकाच दिवसात तीन ‘नरबळी’, अंधश्रद्धेतून घडल्या धक्कादायक घटना

यादरम्यान पिडीतेने पोलिसांना दिलेल्या जाबाबात म्हटलंय की, प्रमोद सलगर याच्या व माझ्यामध्ये वेळोवेळी शारीरीक संबंध झाले आहे. पीडितेच्या सदर जबाबावरुन बीडच्या सिरसाळा पोलीस ठाण्यात, नमुद गुन्हयात 376 (2) (एन), 376 (2) (जे), 120 (ब) भादंवि सह कलम 4, 6, 17 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) 2012 सह कलम 9, 10 बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम वाढ करण्यात आले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या