JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मार्कांच्या बदल्यात सेक्सची मागणी, शिक्षकाच्या कृत्याने शिर्डीत खळबळ

मार्कांच्या बदल्यात सेक्सची मागणी, शिक्षकाच्या कृत्याने शिर्डीत खळबळ

ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकाने 12 वीच्या विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरिष दिमोटे, शिर्डी, 22 जानेवारी : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका नामांकित ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकाने 12 वीच्या विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इंटरनल मार्क्स देण्यावरून शिक्षकाने विद्यार्थीनीला ब्लँकमेल केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले आहेत. बेलापूर गावीतल ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या दालनासमोर काही वेळ ठिय्या आंदोलन केल्यानंतर नराधम शिक्षकाच्या अटकेची मागणी केली. तसंच बेलापूर पोलिस चौकीसमोरही ठिय्या आंदोलन केलं आहे. ‘सदर शिक्षक हा लिंगपिसाट असून यापूर्वीही त्याने अशा पद्धतीचे नीच कृत्य केलं आहे,’ असा आरोप ग्रामस्थ आणि पालकांनी केला आहे. संबधित शिक्षकाचे तात्काळ निलंबन करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता आक्रमकपणे समोर येत आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लग्नात अक्षदा पडल्यानंतर वाहिला रक्ताचा पाट, भरमंडपात तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून दरम्यान, आयुष्याचे धडे गिरवायला शिकवणारे शिक्षकच आता मुलींसाठी धोकादायक ठरत असल्याच्या काही घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्येही असाच प्रकार समोर आला होता. विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच अत्याचार केल्याची खळबळनक घटना नांदेडमध्ये घडली होती. शंकरनगरमध्ये इयत्ता 7 वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 2 शिक्षकांनी अत्याचार केले. भाजप उपाध्यक्ष आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर अध्यक्ष असलेल्या शाळेत ही घटना घडली. शाळेतील मुलीवर 2 महिन्यापूर्वीच अत्याचार करण्यात आले. त्यानंतर आता मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे हा सर्व प्रकार उघडीस आला. अत्याचाराची ही घटना समोर आल्यानंतर आरोपी 2 शिक्षकांसह घटनेची माहिती न देणाऱ्या अन्य 3 अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या