JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई हादरली! वाढदिवसाच्या बहाण्याने चार नराधमांकडून 44 वर्षीय महिलेवर गँगरेप

मुंबई हादरली! वाढदिवसाच्या बहाण्याने चार नराधमांकडून 44 वर्षीय महिलेवर गँगरेप

मुंबईत कोरोना व्हायरस आणि मुसळधार पावसाचा कहर सुरू असतानाच मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जुलै: मुंबईत कोरोना व्हायरस आणि मुसळधार पावसाचा कहर सुरू असतानाच मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चार नराधमांना एका 44 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. मानखुर्द येथे 24 जून रोजी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. हेही वाचा… धक्कादायक! गेल्या 24 तासांत 3 अधिकाऱ्यांसह 30 पोलिसांना कोरोना, 4 जणांचा मृत्यू मानखुर्द पोलिसांनी चारही नराधमांना अटक केली आहे. मात्र, या घटनेने मानखुर्दसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत. मुदस्सीर नबी शेख (30), अब्दुल शेख (34), मुराद शेख (29), हैदल शेख (35), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी धारावीतील लेबर कॅम्प येथील रहिवासी आहेत. वाढदिवसाच्या बहाण्याने बोलावलं… पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अब्दुल शेखने पीडित महिलेस त्याचा मित्र राज यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, असं खोटं सांगितलं होते. आरोपीनं पीडित महिलेला दुसरा आरोपी रहीम शेख याच्या घरी बोलवून घेतलं होतं. तिथं पीडित महिलेला कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर अब्दुल शेख आणि रहीम शेख यांच्यासह चौघांनी महिलेवर आळीपाळीनं बलात्कार केला. नंतर आरोपींनी पीडितेला टॅक्सीतून घरी सोडलं. मात्र, दुसऱ्या दिवशी पीडित महिलेची गुंगी उतरल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. तिनं शरीराची तपासणी केली असता तिच्या सर्वांगावर ठिकठिकाणी ओरबडल्याच्या जखमा आढळून आल्या. आरोपींनी आपल्याला गुंगीचं औषध देऊन आपल्यावर सामुहिक बलात्कार केल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आलं. हेही वाचा… धक्कादायक! गेल्या 24 तासांत 3 अधिकाऱ्यांसह 30 पोलिसांना कोरोना, 4 जणांचा मृत्यू पीडित महिलेने 1 जुलै रोजी चारही आरोपीविरोधात तक्रार मानखुर्द पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी चारही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या