JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गडचिरोलीतील पोलीस ठाण्यावर माओवाद्यांचा गोळीबार; जवानांकडून माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर

गडचिरोलीतील पोलीस ठाण्यावर माओवाद्यांचा गोळीबार; जवानांकडून माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर

गडचिरोलीत माओवाद्यांनी पोलीस स्टेशनवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. माओवाद्यांच्या या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गडचिरोली, 12 मे: गडचिरोलीत माओवाद्यांनी पोलीस ठाण्यावर गोळीबार (maoists firing on Gadchiroli Police station) केल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर (Jambia Gatta Police Station) काही माओवाद्यांनी गोळीबार केला. माओवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास माओवाद्यांनी जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. मात्र, सतर्क असलेल्या जवानांनी या माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत परतवून लावलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करुन जवानांना सापळ्यात अडकवण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न जवानांच्या सतर्कतेमुळे फसला. वाचा :  मोठी बातमी, कोरोना आणि अन्नातून विषबाधेनं 10 माओवाद्यांचा मृत्यू, पोलिसांचा दावा गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल अतिदुर्गम भाग असलेल्या या पोलीस ठाण्याला लक्ष्य करण्याचा माओवाद्यांनी गेल्या एका महीन्यात दुसरा प्रयत्न केला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात सुद्धा माओवाद्यांनी अशाच प्रकारे जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर गोळीबार केला होता. एप्रिल महिन्यात माओवाद्यांनी जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर गोळीबार केला होता. तसेच ग्रेनेड हल्ला सुद्धा केला होता. यावेळी सुद्धा सतर्क असलेल्या जवानांनी माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. यानंतर माओवाद्यांनी माघार घेत जंगलात पळ काढला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या