भंडारा जिल्ह्याच्या भंडारा-साकोली महामार्गावर पलाडी गावाजवळ भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या भंडारा-साकोली महामार्गावर पलाडी गावाजवळ भरधाव कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 4 जणाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतकांमध्ये सुधीर मते (वय 32), शशिकांत सारवे (वय 27) आणि पार्थ पंचभाई (वय 18, सर्व. खोकरला) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. चौथ्या मृत व्यक्तीच नाव समजू शकलं नाही.
मृत सुधीर मते व शशिकांत पारवे दोन्ही आमगांव दिघोरी येथील राहाणारे आहेत. दोघे दुचाकीनं आमगांव दिघोरी येथून भंडाऱ्याच्या दिशेनं जात होते. तितक्या विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव कारनं त्यांच्य दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक बसताच सुधीर मते आणि कारचारक पार्थ पंचभाई याचा जागेवरच मृत्यू झाला. तर शशिकांत पारवे याच्या भंडारा सामान्य रुग्णालयात नेताना मृत्यु झाला.
अति गंभीर जखमी व्यक्तीला नागपूरला नेताना त्या वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. इतर दोन जखमींवर भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.