हिमाचल प्रदेशात 62 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेश सरकारनं 22 ऑगस्टपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंजाबमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीला शाळा, कॉलेज सुरू करण्यात आली होती. तिथं 27 शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाल्यानं सरकारनं शाळांमध्ये कोरोनासंबधीच्या सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
मुंबई 25 मे: कोरोनाबरोबरच (Corona) ब्लॅक फंगससारख्या (Black Fungus) अनेक आजारांनी देशामध्ये सध्या थैमान घातलं आहे. यासह महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळामुळे लोकांचं मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, राज्यात पावसाचं वातावरण कायम आहे. पावसाळा हा आपल्याबरोबर अनेक आजारही घेऊन येत असतो. अशा परिस्थितीत बालरोग तज्ञ आणि राज्यातील कोविड टास्क फोर्सने (Covid-19 Task Force) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पावसाळ्यापूर्वी राज्यात लहान मुलांचं लसीकरण (Vaccination) करण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांना इन्फ्लूएन्जा (Influenza) फ्लूची लस (Flu vaccine) देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कारण, कोरोना आणि फ्लूची सुरुवातीची लक्षणं सारखीच असतात. या स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरेल असं टास्क फोर्सचं म्हणणं आहे. इन्फ्लूएन्जा हा एक संसर्गजन्य आजार आहे. याची लक्षणं बऱ्याच प्रमाणात कोरोनाच्या लक्षणांसोबत मिळते-जुळते आहेत. खोकला, सर्दी, ताप आणि अंगदुखी ही याची लक्षणं आहेत. डॉ सुरेश बिराजदार यांचं असं म्हणणं आहे, की सहा महिने आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्व मुलांना या फ्लूची लस दिली गेली पाहिजे. या फ्लूमुळे निमोनिया होण्याचीही शक्यता आहे. यात अनेकदा श्वास घेण्यासही त्रास जाणवू लागतो. मात्र, लस घेतल्यास या आजाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. यामुळे लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडण्याची शक्यताही कमी होते. ज्या मुलांना श्वासनासंदर्भातील समस्या किंवा अस्थमा आहे, त्यांनीही ही लस घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. इन्फ्लुएन्जा आणि कोरोनाचा संसर्ग बहुतेक बालकांमध्ये दिसून येत आहे. या काळात निमोनिया आणि कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी ही लस अत्यंत गरजेची आहे. इन्फ्लुएन्जाची लस घेतल्यानंतर दोन दिवस ताप आणि अंगदुखी असे काही सामान्य साइड इफेक्ट्स जाणवतात. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. डॉक्टरांनी सांगितलं, की या लसीसोबतच पालकांनी लहान मुलांच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यायला हवं. मुलांनी वारंवार हात धुणे, हात सॅनिटाइज करणं आणि स्वच्छ राहाणं अत्यंत गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. मान्सून जवळ आलेला असताना लहान मुलांना बाहरेच काहीही खाण्यास देणं टाळावं तसंच गरम पाणी पिण्यासाठी द्यावं, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. सोबतच कोणत्याही परिस्थितीमध्ये लसीकरणासाठी विलंब न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.