JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पहिल्याच पावसाने घात केला, बकऱ्या चारण्यासाठी शिवारात गेलेल्या तरुणाचा दुर्देवी अंत

पहिल्याच पावसाने घात केला, बकऱ्या चारण्यासाठी शिवारात गेलेल्या तरुणाचा दुर्देवी अंत

राज्यातील काही भागांमध्ये मान्सून पूर्व पावासामुळे अनपेक्षित आणि दुर्देवी घटना समोर आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात वीज पडून एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वाशिम, 11 जून : राज्यात पुढच्या दोन दिवसात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पुढच्या पाच दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात लवकरच मान्सून दाखल होईल. पण त्याआधीच राज्यातील काही भागांमध्ये मान्सून पूर्व पावासामुळे अनपेक्षित आणि दुर्देवी घटना समोर आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात वीज पडून एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत पाच बकऱ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गीव्हा कुटे येथे घडली. मृतक तरुण हा नेहमीप्रमाणे आपल्या पाच बकऱ्यांना चारण्यासाठी शेतात गेला होता. तो आज एरंडाचे शेतमालक महादेव आनंदा लाखुळे यांच्या कारली शेतशिवारात गेला होता. या दरम्यान दुपारी दोन ते तीन वाजता दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला. यादरम्यान विजेचा कडकडाट सुरु होता. यावेळी अचानक तरुणाच्या अंगावर वीज कोसळली. यात तरुणाचा आणि पाच बकऱ्यांचा मृत्यू झाला. संबंधित घटनेची माहिती शिवाराच्या आजूबाजूने जाणाऱ्या नागरिकांना समजली. त्यानंतर गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. अशीच घटना वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील लाठी येथेदेखील घडली. लाठी येथे रामा सुर्वे यांची दुभती म्हैस वीज पडून ठार झाली आहे. पुरात पूल वाहून गेला दरम्यान, वाशिमच्या आडोळी परिसरात सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात कच्चा पूल वाहून गेला. निर्माणाधीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्याय म्हणून हा कच्चा पूल तयार करण्यात आला होता. पण नाल्याला पूर आल्याने हा पूल वाहून गेला. त्यामुळे अडोळी-जुमडा-गोरेगाव हा आंतरजिल्हा मार्ग बंद झाला आहे. जालन्यातही दुर्दैवी घटना, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू जालन्यात देखील वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जालना जिल्ह्यात आज अनेक भागात विजेच्या कडकडाटसह तुफान पाऊस झाला. या दरम्यान मंठा तालुक्यात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अनिल शिंदे असं या 21 वर्षीय शेतकऱ्याच नाव आहे. तो मंठा तालुक्यातील पेवा येथील आपल्या शेतात काम करत होता. पावसाच्या आगमनामुळे आनंदी अनिल शेतात काम करत असताना अचानक वीज अंगावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या