JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूरमध्ये कोरोनाचा पहिला बळी, तुकाराम मुंढेंसह प्रशासन अलर्ट

नागपूरमध्ये कोरोनाचा पहिला बळी, तुकाराम मुंढेंसह प्रशासन अलर्ट

मृताचे नातेवाईक तसेच संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करून त्यांचेही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे दिली.

जाहिरात

ब्रिटन आणि अमेरिकेतल्या 2 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टरांनी लक्षणांची सहा विभागात विभागणी केली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 7 एप्रिल : राज्याच्या उपराजधानीत कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला असून, मृत 68 वर्षीय व्यक्‍ती सतरंजीपुरा बडी मशीद येथील रहिवासी आहे. मेयो रुग्णालयातील संशयित वॉर्डात चार एप्रिलपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परंतु, अहवाल येण्यापूर्वीच रविवारी मध्यरात्रीनंतर त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून त्यांना शनिवार, 4 एप्रिलला मेयोत भरती करण्यात आले. 5 एप्रिल रोजी त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. परंतु सोमवारी नमुने येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या मरकज येथून आलेल्या व्यक्‍तीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जाते. आता मृताचे नातेवाईक तसेच संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करून त्यांचेही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे दिली. सतरंजीपुरा भागातील बडी मज्जित भागातील पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने महानगरपालिकेची यंत्रणा सक्रिय झाली. सोमवारी रात्रीच मनपाचे आरोग्य पथक परिसरात दाखल झाले. डॉक्टरांनी तपासणी व माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज संपूर्ण परिसरात सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. हेही वाचा- MPSCच्या एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या परीक्षा लांबणीवर, कोरोनामुळे आयोगाचा निर्णय दोनच दिवसापूर्वी मनपातर्फे येथे फवारणी करण्यात आली होती. पॉझिटिव्ह असल्याची खबर मिळताच पुन्हा रात्री रुग्णाचे घर व जवळच्या परिसरात फवारणी सुरू करण्यात आली असून नागपुरातील सतरंजीपुरा परिसर आणि मोनिनपुरा परिसर सील करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या