नागपूर, 21 मे : दोन दिवसांपूर्वी तलावात आंघोळीला उतरलेल्या 12 वर्षीय मुलासह वडिलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. नागपूरच्या हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मोहगाव झिलपी येथे ही दुर्देवी घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या घटनेत अब्दुल आसिफ शेख व शहबीन अब्दुल शेख या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आई आसमा थोडक्यात बचावली. मृतक हे नागपूरच्या टिपू सुलतान चौकात राहत होते. यावेळी समोर उभ्या असलेल्या एका मुलाने हा व्हिडिओ केल्याचं दिसत आहे. तब्बल 4 मिनिटांचा हा व्हिडिओ असून सुरुवातील ते दोघेही बुडत असताना दिसत आहे. यानंतर मोबाइल खाली ठेवल्याची शक्यता आहे. दरम्यान त्या वेळेही ओरडण्याचा आवाज येत आहे. व्हिडिओच्या शेवटी मुलाच्या रडण्याचा आवाज येत आहे. हा व्हिडिओ अत्यंत धक्कादायक असून तलावात अंघोळीसाठी उतरलेल्या 12 वर्षीय मुलाचा त्याच्या वडिलांसह बुडून मृत्यू झाल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
हे ही वाच VIDEO : पोलिसांची दादागिरी! मास्क न घातल्यानं महिलेला मारहाण, केसांना धरुन खेचलं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आधी मुलाचे वडील तलावात पोहत होते. दरम्यान ते बुडू लागले. यानंतर घाबरलेल्या पत्नीने तलावात उडी घेतली व त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आई-वडिलांना तलावात पाहून मुलानेही पाण्यात उडी घेतली. या दुर्देवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.