JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: 'पन्नास खोके मंत्री OK'; धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा शेतकऱ्यांकडून निषेध, मंत्र्याने जवळ बोलावलं पण...

VIDEO: 'पन्नास खोके मंत्री OK'; धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा शेतकऱ्यांकडून निषेध, मंत्र्याने जवळ बोलावलं पण...

शिंदे गटातील सदस्य आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे आज धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना त्यांना एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दीपक बोरसे, प्रतिनिधी धुळे, 3 सप्टेंबर : जून महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले. यानंतर राज्यातील जनतेमध्ये समिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे गटाच्या विरोधातही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. दादा भुसेंना दाखवले काळे झेंडे - यात शिंदे गटातील सदस्य आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे आज धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना त्यांना एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. दादा भुसे हे धुळे दौऱ्यावर असताना त्यांच्या दौर्‍यादरम्यान शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तसेच दादा भुसे हे साक्री तालुक्यातील कासारे गावात उद्घाटन करत असताना शेतकर्‍यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. इतकेच नव्हे तर पन्नास खोके मंत्री ok अशा जोरजोरात घोषणा देत यावेळी शेतकर्‍यांनी दादा भुसे यांचा निषेध केला.

एकीकडे शेतकरी मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात जोरजोरात घोषणा देत होते. त्यांना काळे झेंडे दाखवत होते. या शेतकऱ्यांच्या विरोधादरम्यान यावेळी मंत्री भुसे यांनी काळे झेंडे दाखवणार्‍या शेतकर्‍यांना समजूत घालण्यासाठी जवळ बोलावले. मात्र, या शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही.

जून महिन्याक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने दादाजी भुसे हे शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दादा भुसे यांची मागच्या 20 वर्षांपासून मैत्री असल्याने ते त्यांच्यासोबत गेल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे कृषी खाते होते. तर आता शिंदे सरकारमध्ये त्यांच्या बंदरे व खनिकर्म हे मंत्रालय देण्यात आले आहे. हेही वाचा -  Maharashtra Assembly Monsoon Session : ‘50 खोके…एकदम ओक्के’ विरोधकांच्या घोषणा अन् शिंदेंची एंट्री, शंभूराजे म्हणाले, पाहिजे का? महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंसोबत  गेलेल्या शिवसेना आमदारांवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला. 39 आमदारांना फोडून शिंदे यांनी सुरत व्हाया गुवाहाटी गाठले होते. शिंदे गुवाहाटीला पोहोचले तेव्हा त्यांच्या गटात एक एक करून शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार गटात सामील झाले होते. या आमदारांना 50 कोटी रुपये देण्याची आल्याची चर्चा रंगली होती. प्रत्येक आमदाराला 50 कोटी मिळाल्याचा आरोपही ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. यामुळेच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही 50 खोके एकदम ओके, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या