JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जात आहे 'एक्सपायर्ड डेटेड मेडिसिन'

धक्कादायक! क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जात आहे 'एक्सपायर्ड डेटेड मेडिसिन'

क्वारंटाइन असलेल्या महिलेने गोळ्याच्या पाकिटावर असलेली मुदत पहिल्यानंतर गोळ्या घेण्यास विरोध केल्यानंतर ही बाब सामोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जालना, 26 जुलै: जालन्यात क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना एक्सपायर्ड डेटेड cipcovit forte व्हिटॅमिन गोळ्या दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. क्वारंटाइन असलेल्या महिलेने गोळ्याच्या पाकिटावर असलेली मुदत पहिल्यानंतर गोळ्या घेण्यास विरोध केल्यानंतर ही बाब सामोर आली आहे. जालना जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असताना ही बाब समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. हेही वाचा.. रात्री 12 वाजता HR नं हॉस्टेलवर येऊन धमकावलं, पुण्यात जहांगिर हॉस्पिटल स्टाफ भडकला! जालना जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलं आहे. जालना शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलींच्या वसतीगृहात 48 रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांना या एक्सपायर्ड डेटेड cipcovit forte व्हिटॅमिन गोळ्या दिल्या जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या सुनंदा सुरटे या महिला रुग्णाची एक किडनी निकामी आहे. त्यांना या गोळ्या दिल्यानंतर त्यांनी गोळ्यावर असलेली मुदत पहिली. नंतर त्यांनी गोळ्या घेण्यास विरोध करत मला या गोळ्या चालत नाही, असे सांगितलं. मात्र तरी देखील त्यांचं कुणीही ऐकलं नाही. अखेर सुनंदा सुरटे यांनी नातेवाईकांना फोन करून सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला. याबाबत नातेवाईकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. अद्याप या प्रकरणाची कुणीही दखल घेतली नसल्याचं सुनंदा सुरटे यांनी सांगितलं आहे. हेही वाचा… भारतात एकाच दिवसात 64% रुग्ण बरे; वाढत्या आकड्याला घाबरू नका कोरोनाला हरवणं शक्य जालना जिल्ह्यात सद्या कोरोनानी थैमान घातलं आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1764 वर पोहोचली आहे. तर 59 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यातच ही धक्कादायक बाब सामोर आल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जबाबदार व्यक्तीवर कारवाई करून योग्य उपचार करण्याचे आदेश घ्यावे, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या