JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Eknath Khadase vs Girish Mahajan : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी, दूध संघाचा वाद घराणेशाहीवर गेला

Eknath Khadase vs Girish Mahajan : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी, दूध संघाचा वाद घराणेशाहीवर गेला

जळगावमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्यातील वाद आता विकोपाला जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 17 नोव्हेंबर : जळगावमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्यातील वाद आता विकोपाला जात आहे. मागच्या काही दिवसांपासून गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे एकमेकांवर जोरदार प्रहार करताना दिसून येत आहे. हा वाद जळगाव दुध संघावरून होत आता घराणेशाहीवर गेला आहे. गिरीष महाजन यांनी एकनाथ खडसेंवर घराणेशाहीवरून टीका केली होती. यावर आता एकनाथ खडसेंनी महाजन यांच्यावर पटवार केला आहे. दरम्यान त्यांच्यातील वाद आता विकोपाला जात असल्याचे दिसून येत आहे.

तळोदा (जि. नंदुरबार) येथे मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर घराणेशाहीची खाेचक टीका केली होती. त्यावर पत्रकारांशी संवाद करताना खडसे म्हणाले, मंत्री महाजन हे तळोदा येथे बोलत असताना खासदार हीना गावित त्यांच्या शेजारी उपस्थित होत्या. खासदार गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे मंत्री आहेत. त्यांची दुसरी मुलगी जिल्हा परिषदेची अध्यक्षा आहे. त्यांचे भाऊ आमदार आहेत. एकाच कुटुंबात ही पदे आहेत. त्यांच्या शेजारी उभे राहून मंत्री महाजन असे वक्तव्य करतात.

हे ही वाचा :  बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली पाहायलाच हवीत अशी 10 व्यंगचित्रं

संबंधित बातम्या

एकाच घरात पदे असतात याची मंत्री महाजन यांना अजून कल्पना आलेली नाही. त्यांच्या पत्नी साधना महाजन गेल्या २५ वर्षे सरपंच, जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि आता नगराध्यक्षा आहेत. आपल्याच घरात पदे कशाला पाहिजेत. दुसऱ्याला पदे देता आली असती असे प्रत्युत्तर आमदार एकनाथ खडसे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.

जाहिरात

एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोटे आपल्याकडे असतात. साधना महाजन या तुमच्याच कुटुंबातील आहे हे तुम्ही विसरला का? त्यांना २५ वर्षे कशी पदे दिली. दुसऱ्यांना संधी दिली असती ना? दुर्दैवाने गिरीश महाजनांना मुलगा नाही. नाहीतर मुलगा आणि सून दोघांना पदे मिळाली असती आणि कदाचित तेही राजकारणात आले असते असे खडसे म्हणाले.

जाहिरात

घराणेशाहीचा नियम फडणवीस यांनाही लागू स्वकर्तृत्वाने राजकारणात येणारे अनेक असले तरी भाजपत येणाऱ्यांमध्ये घराणेशाही असलेल्यांची संख्या मोठी आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यापैकी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. त्यांच्या काकू मंत्री होत्या. फडणवीस हे सुद्धा अशा कुटुंबातूनच आलेले आहेत. त्यांनाही हा नियम लागू केला पाहिजे, असा टोला आमदार एकनाथ खडसे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  ‘जशी प्रेयसीची आठवण, तशी 40 खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची’ खडसेंनी कवितेतून शिंदेंना लगावला टोला, VIDEO

मुलीला तिकीट दिलं आणि व्यवस्था काय केली तर पाडण्याची हे मी सांगत नाही तर मुख्यमंत्री मुक्ताईनगर मध्ये स्वतः सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री सांगतात मुक्ताईनगर मध्ये आमदार चंद्रकांत पाटील निवडून आले यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे तो गिरीश महाजन यांचा त्यामुळे गिरीश महाजन यांनीच गद्दारी केली अशी पावतीच मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या