डोंबिवली, 17 जुलै : इमारतीमधील रहिवाशांत किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत (Fight among society members) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतील या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल (Dombivli video viral) सुद्धा होत आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून चार जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील देसले पाडा परिसरात भांडणाचं एक धक्कादायक प्रकार समोर आले. साई इन्कल्यू या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्याने इमारतीच्या एका मजल्यावर घाण केली. दुसऱ्या एका महिलेने या मुद्द्यावर त्या महिलेशी वाद घातला. ज्या महिलेचा कुत्रा होता तिने साफसफाई केली नंतर हा वाद वाढला. EXCLUSIVE: राजकीय गोटातून सर्वात मोठी बातमी
त्यानंतर याच मुद्यावर इमारतीमधील रहिवाशी आपापसात भिडले. महिलांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती त्यात काही पुरुष सुद्धा सामील झाले. या हाणामारी चा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. मानपाडा पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे.