JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Corona Virus In Maharashtra: राज्यातल्या Corona संकटावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं महत्त्वाचं वक्तव्य

Corona Virus In Maharashtra: राज्यातल्या Corona संकटावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं महत्त्वाचं वक्तव्य

राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या (corona patients) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 01 मे: राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या (corona patients) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात कोरोना आटोक्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं राज्य सरकारनं निर्बंध हटवले. मात्र त्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं राज्याची चिंता वाढली आहे. यावर अजित पवार यांना राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लागणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा; मुंबई, ठाण्यात पोलिसांची मोठी हालचाल पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निर्बंधांसंबधी भाष्य केलं. काय म्हणाले अजित पवार करोना रुग्णसंख्या वाढत असल्यानी मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. पुन्हा मास्क वापरण्यासाठी सांगायचं की नाही यावरही चर्चा झाली. सद्यपरिस्थिती पाहता लोकांना आवाहन केलं असून ऐच्छिकच ठेवलं असल्याचं ते म्हणालेत. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली तर निर्बध लागू शकतात तसे टास्क फोर्सशी बोलून निर्णय घेऊ असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात असून तज्ज्ञांशी चर्चा केली जात असल्याचंही ते म्हणालेत. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर काही बंधनं लागू करु शकतो, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाचे संकट कमी झालं असलं तरी अजून ते संपलं नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या