JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Delivery Boy Mumbai Crime : किरकोळ कारणावरून डिलिव्हरी बॉयची निर्घृण हत्या, घटना CCTV मध्ये कैद

Delivery Boy Mumbai Crime : किरकोळ कारणावरून डिलिव्हरी बॉयची निर्घृण हत्या, घटना CCTV मध्ये कैद

मीरा रोड पूर्वेकडील शांती पार्क संकुलातील जांगीड शार्कल येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिवाकर सिंग (मुंबई), 31 जानेवारी : मीरा रोड पूर्वेकडील शांती पार्क संकुलातील जांगीड शार्कल येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अंकुश राज असे मृत तरुणाचे नाव असून त्यांचे वय सुमारे 21 वर्षे असण्याची शक्यता वर्तवली आहे. ही घटना काल (दि.30) सोमवारी उशिरा घडली. काशीमीरा गुन्हे शाखेने याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मयत तरुण जवळच राहत होता आणि एका ई-शॉपिंग कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. आपसातील वादामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज आहे. हत्येच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडीओ समोर आला असून, त्यात आरोपी तरुण मृताला मारहाण करताना दिसत आहेत.

हे ही वाचा :  बँकेच्या माजी अध्यक्षाच्या घरी ED सापडलं घबाड, 2 कोटींचे हिरे, 4 आलिशान कार आणि बरंच काही..

संबंधित बातम्या

गंभीर जखमी झालेल्या अंकुशला नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. अंकुशचे एक दिवस आदी काही जणांशी भांडण झाले होते. त्या घटनेचा हत्येशी काही संबंध आहे का, याचा तपास मिरा रोड पोलीस करत आहेत.

या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली होती. मागच्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि परिसरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाच मिरा रोड पोलीस कसून तपास करीत आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या