JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवामुळे राडा, पोलिसांवर केली दगडफेक, 3 जखमी

ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवामुळे राडा, पोलिसांवर केली दगडफेक, 3 जखमी

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा इथं ही घटना घडली आहे.

जाहिरात

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा इथं ही घटना घडली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिंगोली, 20 सप्टेंबर : राज्यात 608 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला आहे. पण, हिंगोलीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्यामुळे एका गटाने जोरदार राडा घातला. यावेळी वाद मिटवणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की आणि दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा इथं ही घटना घडली आहे. हिंगोलीत ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या गटाने विजयी उमेदवाराच्या घरासमोर गोंधळ घालण्याचा प्रकार औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथे सोमवारी सायंकाळी घडला आहे. हा वाद आणि गोंधळ शांत करण्यासाठी जमाव पागण्यास गेलेल्या पोलिसांनाच पराभूत गटाकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. (शिवतीर्थावर"टोमणे मेळावा"साठी…, मनसे नेत्याची वादात उडी, शिवसेनेला डिवचले) एवढेच नव्हे तर पोलिसांवर दगडफेक देखील झाली आहे. या दगडफेकीत औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे रात्री या गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. सध्या गावात शांतता असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणी 30 ते 40 आरोपीं विरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ( नारायण राणेंना कोर्टाचा दणका, 10 लाखांचा ठोठावला दंड, मुंबई पालिका अखेर जिंकली ) दरम्यान, हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात एकूण सहा ग्रामपंचायतीमध्ये दोन ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहे. तर चार ग्रामपंचायतीच्या जनतेतून सरपंच पदाची निवडणूक पार पडली. यावेळी निवडून आलेल्या सरपंचांच्या समर्थकांनी गुलाल उधळत तहसील परिसरामध्ये जल्लोष केला. निवडणूक झालेल्या चार आणि बिनविरोध झालेल्या दोन अशा सहाही ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या