JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पिंपरीत स्कोडा गाडीत आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उलगडलं; दारू पाजून आवळला गळा

पिंपरीत स्कोडा गाडीत आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उलगडलं; दारू पाजून आवळला गळा

Murder News: पिंपरी शिवारात शुक्रवारी एका स्कोडा गाडीत (Skoda vehicle) मृतदेह आढळला (Dead body found) होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या हत्येचं गूढ (Murder) उलगडलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिंगोली, 06 जून: आखाडा बाळापूरजवळील पिंपरी शिवारात शुक्रवारी एका स्कोडा गाडीत (Skoda vehicle) मृतदेह आढळला (Dead body found) होता. हा मृतदेह नांदेडमधील एका व्यक्तीचा होता. तातडीने पावलं उचलत आखाडा बाळापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या हत्येचं गूढ (Murder) उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी एका संशयित आरोपीला अटक (Accused arrest) केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संबंधित हत्या अनैतिक संबंधातून (Immoral relationship) झाल्याची माहितीही आरोपीने प्राथमिक चौकशीत दिली आहे. याप्रकरणी पोलीस अन्य दोन आरोपींचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री उशीरा नांदेड येथील रहिवासी असणाऱ्या माणिक राजाराम राजेगोरे यांचा मृतदेह आखाडा बाळापूरजवळील पिंपरी शिवारात एका स्कोडा गाडीत आढळला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी केली असता, मृतदेहाचे केस आणि गाडीचा काही भाग जळल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याची खात्री पोलिसांना पटली. हत्येची घटना घडल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत आखाडा बाळापूर पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील घोगरी येथील रहिवासी असणाऱ्या कैलास मारोतराव चिलटेवार या संशयित आरोपीला अटक केली. आरोपी चिलटेवारची चौकशी करत असताना, त्याने उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण पोलिसी खाक्या दाखवताचं आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. हे ही वाचा- रक्ताची नाती जीवावर उठली; कोल्हापूरात मुलाच्या मदतीनं सख्ख्या भावाचा काढला काटा आरोपीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मृत राजेगोरे यांना गोड बोलून दारु पाजली. राजगोरे यांना दारू प्यायल्याने धुंदी आल्याचं लक्षात येताच आरोपींनी राजगोरे यांची गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न देखील केला आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची माहितीही आरोपीने प्राथमिक चौकशीत दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या