JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुणे जिल्ह्यातील भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; सोशल मीडियावरुन दिली माहिती

पुणे जिल्ह्यातील भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; सोशल मीडियावरुन दिली माहिती

राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 7 जुलै/ सुमित सोनवणे : दौंड तालुक्याचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दौंड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आमदारांनाच कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान राहुल कुल यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. काही दिवसांपूर्वी दौंडचे माजी नगराध्यक्ष यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आमदार राहुल कुल यांनीही कोरोना चाचणी केली होती. आज त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. मात्र आमदार राहुल कुल यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, शिवाय राहुल कुल यांच्या कुटुंबीयांचा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. हे वाचा- ‘राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत; त्यांनी डेमो पाहावा’ कंपनीने दिलं प्रत्युत्तर आमदार राहुल कुल हे मागील अनेक दिवसांपासून तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावला आटोक्यात आणण्यासाठी सातत्याने अधिकांरांच्या बैठकी घेत होते, आरोग्य विभाग, प्रांत अधिकारी, तहसिलदार, पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून योग्य त्या सूचना करीत होते.

एकमेकांच्या साथीने आपल्याला लढायचंय… कोरोनाला हरवायचंय.. Posted by Rahul Subhash Kool on  Tuesday, July 7, 2020

हे वाचा- सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; कोविडमधून बरा झालेल्या रुग्णाच्या स्वागताला मोठी गर्दी राहुल कुल यांनाच कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे, सध्या दौंड तालुक्यात कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येने 200 चा टप्पा पार केला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 14 दिवस संपूर्ण दौंड शहरात लॉकडाउन जाहीर केला आहे. सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंतच शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या