JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विषारी ताडी तयार करणाऱ्यांवर क्राईम ब्रँचचा छापा, आरोपींना अटक

विषारी ताडी तयार करणाऱ्यांवर क्राईम ब्रँचचा छापा, आरोपींना अटक

अवैध ताडी विक्री सुरू असल्याची माहिती बारामती क्राईम ब्रांचचे अधिकारी चंद्रशेखर यादव यांना मिळाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुमित सोनवणे, दौंड, 27 फेब्रुवारी : दौंड तालुक्यातील खडकी गावाच्या हद्दीत अवैध ताडी विक्री सुरू असल्याची माहिती बारामती क्राईम ब्रांचचे अधिकारी चंद्रशेखर यादव यांना मिळाली. त्यानंतर क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांनी अवैध ताडी विक्रीवर धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसंच ताडी बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जप्त केल्या आहेत. छापा टाकल्यानंतर पोलीसांनी आरोपीलाच ताडी कशी बनवतात, हे प्रत्यक्ष करून दाखविण्यास सांगितले. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खडकी-रावणगाव येथे जाऊन गोपनीय माहितीच्या आधारे बारामती क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी आणि दौंड पोलीस स्टेशनचे जवान यांनी संयुक्त कारवाई करत विषारी ताडी तयार आणि विक्री करण्याऱ्या व्यवसायावर अचानक छापा टाकला. या ठिकाणी आरोपी दुर्गेश श्रीशैल भंडारी राहणार खडकी, हा क्लोरल हायड्रेट, sackharin आणि रंग येण्यासाठीची पावडर याचा वापर करून बनावट ताडी तयार करून ती खरी ताडी असल्याचे भासवून विक्री करत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 40 लीटर बनावट ताडी आणि क्लोरल हायड्रेट, sackharin आणि रंग येण्यासाठीची पावडर असा एकूण 5,895 रुपये चा मुद्देमाल जप्त करून या आरोपी विरोधात दौड पोलीस ठाण्यात फसवणूक 420 भा द वि आणि 65 ख मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही ताडी मानवी आरोग्यास अतिशय हानीकारक आहे. तरीही तयार करून विक्री होत असल्याने आणि मजूर वर्ग बळी पडत असल्याने पोलिसांकडू याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या