JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लॉकडाऊनमध्ये चोरीतील गुन्हेगार गजाआड, पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांच्या कारवाईला यश

लॉकडाऊनमध्ये चोरीतील गुन्हेगार गजाआड, पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांच्या कारवाईला यश

या टोळीला गजाआड करण्यात अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी-चिंचवड, 18 जून : लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणताच पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. मागील आठवड्यात पिंपरीतील थरमॅक्स चौकात असलेले ICICI बँकेचे ATM मशिनला मोटारीच्या मदतीने दोर बांधून मुळासकट उचकटून नेण्याचा प्रकार घडला होता. या टोळीला गजाआड करण्यात अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलं आहे. एटीएममधील 5 लाखाहून अधिक रक्कम या आरोपींनी लुटली आणि ATM मशीन नदी पात्रात फेकून देऊन हे गुन्हेगार फरार झाले होते. मात्र लॉकडाऊन असताना देखील या चोरांनी दाखवलेले धाडस त्यांच्या अंगलट आलं आहे. कारण पोलिसांनी जेव्हा निगडी ते मांजरी या परिसरातील सीसीटीव्ही तपासले, तेव्हा ज्या गाडीतून हे चोर ATM चोरून नेत होते. हेही वाचा - पुण्यात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन, चिनी वस्तूंची केली तोडफोड केवळ ती एकच गाडी रस्त्यावर फिरताना पोलिसांना आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी गाडी मालकाचा शोध लावला आणि खबऱ्यामार्फत या आरोपींपर्यंत पोहोचून त्यांनी सराईत गुन्हेगार अजयसिंग दुधानी, शेऱ्या उर्फ श्रीकांत धोत्रे यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, सदर प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सतीश कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या