JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी, 'मेड इन इंडिया' कोव्हॅक्सिन लस नागपूरमध्ये तिघांना दिली, रिपोर्ट आले नॉर्मल!

मोठी बातमी, 'मेड इन इंडिया' कोव्हॅक्सिन लस नागपूरमध्ये तिघांना दिली, रिपोर्ट आले नॉर्मल!

कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यात आल्यानंतर नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटलची निवड करण्यात आली होती. या लसीच्या चाचणीसाठी 50 जण पुढे आले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 28 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनावर लस काढण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे भारतात भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोरोनावरील देशातील पहिल्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या लसीची चाचणी ही नागपूरमध्ये करण्यात आली आहे. सोमवारी तीन रुग्णांना ही लस देण्यात आली आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांना  नागपूरमधील गिल्लूरकर हॉस्पिटलमधून सुरुवात झाली आहे. या लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्पात सोमावारी  दोन पुरुष आणि एका   महिलेला  ही लस देण्यात आली. त्या लसीचे या व्यक्तींना कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. पुढील 14 दिवसापर्यंत यांना कोणतीही लक्षणे किंवा त्रास नसल्यास कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोज दिला जाणार आहे. मोठी बातमी! देशात 5 जागांवर होणार कोरोना लशीचं शेवटचं ह्यूमन ट्रायल दुसऱ्या टप्प्यात नागपूरचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह आणखी चार संस्था आहेत. कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यात आल्यानंतर  गिल्लूरकर हॉस्पिटलची निवड करण्यात आली होती. त्यानंतर या लसीच्या चाचणीसाठी 50 जण स्वत: पुढे आले आहे. मागील आठवड्यात या सर्वांची तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमने मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यातील आठ व्यक्तींचे नमुने सामान्य आल्याने यातील तिघांना सोमवारी लस देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जर या लसीची चाचणी यशस्वी ठरली तर महाराष्टासाठी ही सर्वात मोठी बातमी ठरणार आहे. जून महिन्यात पुण्यातल्या भारत बायोटेक आणि राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेच्यावतीने COVID-19वर लस  तयार करण्यात आली आहे.  त्यानंतर DCGI ने परवानगी दिल्यानंतर आता जुलै महिन्यापासून देशभर या लशीची मानवी क्लिनिकल चाचणीला सुरुवात झाली आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) - नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या सहकार्याने ही लस तयार करण्यात आली आहे. शास्त्रज्ञांना सर्वात मोठं यश, कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडली पहिल्या टप्प्यात दिल्ली, रोहतांग, हैदराबाद, पाटणा या 4 ठिकाणी पहिली चाचणी होईल. त्याचे परिणाम पाहून पुढच्या टप्प्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर कानपूर, गोवा, बेळगाव,  चेन्नई, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर इथल्य सेंटर्सवरही या चाचण्या केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 375 जणांवर तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये 750 जणांवर ही चाचणी होणार आहे. नागपूरमध्ये यासाठी 50 जणांची निवड करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या