JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गावी पोहोचण्यासाठी 2 तरुण आणि 7 तरुणींनी केला 'गनिमी कावा', पोलीसही झाले हैराण

गावी पोहोचण्यासाठी 2 तरुण आणि 7 तरुणींनी केला 'गनिमी कावा', पोलीसही झाले हैराण

या मुलांनी चक्क सह्याद्रीच्या आडवाटांचा आसरा घेत थेट चिपळूणमध्ये प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, यात 7 मुलींचा समावेश आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चिपळूण, 01 एप्रिल : कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही जिल्ह्या-जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. टोल नाक्यावर आलेल्या गाड्या परत पाठवून देण्यात येत आहे. परंतु, साताऱ्यातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुण आणि तरुणींनी गनिमी कावा करत आपलं घर गाठलं खरं पण पोलिसांपासून हे लपवून राहिलं नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कोकणात देखील कंबर कसून तयारी करत आहे. त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.  त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही जिल्ह्याबाहेर जाता अथवा आत येता येत नाही. परिणामी जिल्ह्याच्या बाहेर अडकलेल्या अनेकांचा मार्ग आता बंद झाला आहे. मात्र, असे असताना देखील काहीजण अनेक युक्त्या वापरताना दिसत आहेत. हेही वाचा - इंदुरीकर महाराजांचा कोरोना लढ्यात पुढाकार, दिला इतका निधी! सातारा मधल्या लोणंद इथं खासगी कंपनीत काम करणाऱ्या 9 मुलांनी आपलं घर गाठण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. मुख्य मार्गावरील असलेल्या पोलिसांना चकवा देण्यासाठी या मुलांनी चक्क सह्याद्रीच्या आडवाटांचा आसरा घेत थेट चिपळूणमध्ये प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, यात 7 मुलींचा समावेश आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगातून काहीजण चिपळूणमध्ये येत असल्याची माहिती अलोरे पोलिसांना लागल्यानंतर लगेच त्यांनी या मुलांना ताब्यात घेतलं आणि क्वारंटाइन केलं आहे. हेही वाचा - मानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह ताब्यात घेतलेले सर्वजण हे चिपळूण - संगमेश्वर आणि गुहागर तालुक्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून वारंवार सूचना करून देखील कोरोनाच्या भीतीने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी अनेकजण जीव धोक्यात टाकून असा प्रवास करताना वारंवार समोर येत आहे. त्यामुळे हा देखील आता चिंतेचा विषय बनला आहे.  लोकांनी जीव धोक्यात न टाकता घरी राहा,सुरक्षित राहा असं आवाहन करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या