त्यामुळे रशियाच्या या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे.
अहमदनगर, 1 मे : लॉकडाऊनमुळं दारूची दुकानं बंद असली तरी, छुप्या मार्गानं दारू विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात उघडकीस आला आहे. शहरातील सरकारी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका रुग्णवाहिकेमधूनच दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात दारूची दुकानं बंद आहेत. मात्र, छुप्या मार्गानं दारूविक्री सुरूच आहे. अहमदनगरमध्ये रुग्णवाहिकेमधूनच दारूची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत रुग्णवाहिका जप्त केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दुचाकीवरून दारूचे बॉक्स वाहून नेत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दुचाकीला अडवून दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडले. या दोघांकडे चौकशी केली असता रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका रुग्णवाहीकेमधून दारू पुरवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात दारू सापडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. हेही वाचा - रुग्ण बरा झाल्यानंतरही शरीरात ‘या’ भागात लपून राहतो Corona, चाचणीतही होत नाही निदान यापूर्वीही घडला होता असाच प्रकार जिल्हा रुग्णालयाच्या आवारत असलेल्या कॅन्टीनमध्ये 2016 मध्ये बनावट दारू कांड झाले होते. त्यावेळी 14 जणांचा मृत्यू झाला होता आणि 9 जणांना कायमचे अपंगत्व आले होते. त्या घटनेतही शासकीय रुग्णालयातील कर्मचारी आरोपी आहेत. तर आताच्या प्रकरणातही शासकीय कर्मचारी सहभागी असल्याने शासकीय रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याची चौकशी होणार का> हा प्रश्न विचारला जात आहे. संपादन - अक्षय शितोळे