मुंबई, 1 जून: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत असताना मात्र, काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar) केवळ मे महिन्यात 9 हजारांहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग (child tests covid positive) झाला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिन्याभरात इतक्या लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ही कोरोनाची तिसरी लाट तर नाहीये ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान आता आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) स्पष्टीकरण दिलं आहे. आरोग्य विभागाने म्हटलं, महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोगतज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
कोरोना संसर्गित मुलांचे प्रमाण खालील प्रमाणे नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 या दरम्यान वयोगटानुसार बाधीतांचे प्रमाणे असे आहे- शून्य ते पाच 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.4 टक्के, बारा ते सतरा 4.1 टक्के, एकूण 7.8 टक्के. नोव्हेंबर 2020 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.1 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.5 टक्के, एकूण 6.9 टक्के) डिसेंबर 2020 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.1 टक्के, सहा ते अकरा वर्षे 1.9 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.3 टक्के, एकूण 6.3 टक्के) जानेवारी 2021 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.1 टक्के, सहा ते अकरा वर्षे 1.7 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.2 टक्के, एकूण 6.0 टक्के) फेब्रुवारी 2021 (शून्य ते पाच वर्षे 1.18 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.00 टक्के, बारा ते सतरा वर्षे 4.08 टक्के, एकूण 7.26 टक्के) राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट, लहान मुलांवर कोरोनाचं सावट मार्च 2021 (शून्य ते पाच वर्षे 1.10 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.04 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.64 टक्के, एकूण 6.78 टक्के) एप्रिल 2021 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.42 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.62 टक्के, बारा ते सतरा वर्षे 4.34 टक्के, एकूण 8.38 टक्के) या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते की कोरोना संसर्गित बालकांचे प्रमाण गेल्या सहा महिन्यात जवळपास तेवढेच राहिले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संसर्गाची स्थिती काहीशी अशीच आहे. मार्च 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 188 रुग्ण होते, ते एकूण रुग्णांच्या 1.01 टक्के होते, सहा ते दहा वर्षे वयोगटातील 270 रुग्ण, एकूण प्रमाण 1.45 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 1173 रुग्ण, एकूणात प्रमाण 6.28 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 1631 रुग्ण एकूणात प्रमाण 8.74 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 18 हजार 669) एप्रिल 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 757 रुग्ण, एकूण रुग्णांच्या 0.98 टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात 1510 रुग्ण, एकूणात प्रमाण 1.95 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 5340 रुग्ण, एकूणात प्रमाण 6.90 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 7607 रुग्ण एकूणात प्रमाण 9.83 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 77 हजार 344) मे 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 1076 रुग्ण एकूण रुग्णांच्या 1.33 टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात 1918 रुग्ण, एकूणात प्रमाण 2.37 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 6422 रुग्ण, एकूणात प्रमाण 7.95 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 9416 रुग्ण एकूणात प्रमाण 11.65 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 80 हजार 785) यावरून हे दिसून येते की 18 वर्षांखालील मुलांमधे संसर्गाचे प्रमाण साधारणपणे सारखेच आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्या वाढीमुळे बालकांच्या संसर्गातील वाढ दिसून आली आहे.