Medical workers in protective suits entering a building under lockdown in downtown Kuala Lumpur, Malaysia, on Tuesday, April 7, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to the public to help curb the spread of the new coronavirus. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (AP Photo/Vincent Thian)
मुंबई, 10 जुलै : राज्यात गेले काही दिवस 6000 वर कोरोना रुग्णांची दररोज भर पडत आहे. त्यात किंचित घट झाल्यानंतर गेल्या 24 तासांमध्ये मात्र राज्यात पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळाला. दिवसभरात 7862 रुग्ण आढळून आलेत. तर 226 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 5366 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,38,461 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 9893 वर गेला आहे. Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. पण मृत्यूदर फारसा वाढलेला नाही , हा त्यातल्या त्यात दिलासा म्हणावा लागेल. ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ठाणे जिल्ह्यात आहे. मुंबई 23035 ठाणे 30977 पुणे 18680 पालघर 4238 रायगड 3953 या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 12 जुलैपर्यंत असलेला लॉकडाऊन आता 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेनेही असेच आदेश दिले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी 416 ने वाढ झाली. शहरात रुग्णांची संख्या 12469 झाली आहे. आतापर्यंत 6954 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 463 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी सोमवारपासून (13 जुलै) कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. Coronavirus : आप्तांची परिस्थिती भीषण! जीव वाचवण्यासाठी मुंबईत लागत आहेत रांगा महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट - 55.62% कोविड मृत्यूदर - 4.15% अॅक्टिव्ह रुग्ण - 95,647 एकूण मृत्यू - 9893 एकूण रुग्णसंख्या - 2,38,461 देशाच्या मानाने महाराष्ट्राचा मृत्यूदर अजूनही चढा आहे. देशाचा विचार केला तर सरासरी कोविड मृत्यूदर 3 टक्क्यांच्या खाली गेला आहे. राज्यात मुंबईत कोरोनारुग्ण अधिक पण साथ नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. पुण्यात मात्र Coronavirus ची लागण वाढत आहे. हवेतून पसरणारा Coronavirus किती धोकादायक? पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. (Pune Covid-19 patient ) दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.