JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा! पण आता 4 आठवड्यांतच 2 जिल्ह्यांनी पुन्हा कोरोना 'ताप' वाढवला

मुंबई, पुणे, ठाण्यात दिलासा! पण आता 4 आठवड्यांतच 2 जिल्ह्यांनी पुन्हा कोरोना 'ताप' वाढवला

देशातील 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणं वाढत (Daily corona cases increased in 22 districts) आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै : गेल्या काही आठवड्यात कोरोनाची (Coronavirus) प्रकरणं झपाट्याने कमी झाली होती. पण आता गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून कोरोना प्रकरणं कमी होण्याचा वेग घटला आहे. यामुळे आता मोदी सरकारची चिंता पुन्हा वाढली आहे. 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणं वाढत (Daily corona cases increased in 22 districts) आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे आणि हे जिल्हे म्हणजे बीड (Coronavirus cases in Beed) आणि सोलापूर (Coronavirus cases in Solapur) . मुंबई, पुण्यात कोरोना आवाक्यात आलेला असताना बीड आणि सोलापूरने आता राज्यासह केंद्राचंही टेन्शन वाढवलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बीड, सोलापूरसह 22 राज्यांमध्ये गेल्या 4 आठवड्यांत कोरोनाची दैनंदिन नवीन केसेस वाढत आहेत.

संबंधित बातम्या

26 जुलैच्या आकडेवारीनुसार 54 जिल्ह्यांमध्ये वीकली पॉझिटिव्ही रेट हा 10% पेक्षा जास्त आहे, अशी माहिती  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव्ह अग्रवाल यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्रातील एकही जिल्हा नाही हा एक दिलासा आहे. हे वाचा -  धक्कादायक! मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग राज्याचा आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक राज्यातील 25 जिल्ह्यांमधील वीकली प़ॉझिटिव्हीटी रेट हा 0.1% च्या खाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, ठाण्याचा समावेश आहे. तर सध्या कोरोना प्रकरणं वाढत असलेले 10 जिल्ह्यांमघील पॉझिटिव्ही रेट हा 0.15% आणि 0.85% यादरम्यान आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, सोलापूर, पालघर, बीज, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. 0.1%  पेक्षा कमी वीकली प़ॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियम शिथील कऱण्याचा विचारही सरकार करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या