JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अनलॉकसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, या व्यवसायासाठी दिली परवानगी

अनलॉकसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, या व्यवसायासाठी दिली परवानगी

मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जुलै : राज्यात कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. अशात मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान आहे. त्यामुळे कन्टेनमेंट झोन वगळता हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस, लॉज काही प्रमाणात खुले होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्य सचिव यांनी आदेश जारी केले आहेत. राज्यात मुंबई, पुण्यासारख्या अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यानुसार ज्या परिसरात जास्त रुग्ण आहेत आणि जो परिसर कन्टेनमेंट झोनमध्ये येतो अशा ठिकाणी हॉटेल्सला सुरू करण्यासाठी परवाणगी देण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 8 जुलैपासून हॉटेल्स सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे व्यवयायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. खरंतर, कोरोनाचा धोका वाढत असल्याने अनेक नियमांच्या अंतर्गतच हॉटेल्सला सुरू करण्यासाठी परवाणगी देण्यात आली आहे. संपूर्ण क्षमतेपैकी 33 टक्के वापर गेस्ट हाऊस, लॉज आणि हॉटेल याचा वापर करता येणार आहे. स्थानिक मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती यावर वेगळा निर्णय घेऊ शकतात अशीही माहिती देण्यात आली आहे. ‘..और मरना कब है ये हम नही डिसाईड करते’, सुशांतच्या अखेरच्या सिनेमाचा ट्रेलर लॉच मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असं सांगितलं होतं. मुख्यमंत्री म्हणाले होते की, ‘मुंबई आणि शहरांतील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आमच्याबरोबर आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरू करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी देण्यात येईल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.’ ‘आता सहन होत नाही’ चीनच्या त्या बातमीवर आनंद महिद्रांनी व्यक्त केली चिंता स्वयंशिस्तही महत्वाची -आदित्य ठाकरे ‘हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिलं कारण पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या श्हरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करतांना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्वाचे आहे,’ असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या