JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फिरायला गेले आणि अडकून बसले; पैसेही संपत आले, महिला पर्यटकांना कोसळलं रडू

फिरायला गेले आणि अडकून बसले; पैसेही संपत आले, महिला पर्यटकांना कोसळलं रडू

बाली येथे पर्यटनासाठी गेलेले 34 पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 27 मार्च : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प असल्याने लाखो भारतीय परदेशात अडकले आहेत. भारतातून इंडोनेशिया, बाली येथे पर्यटनासाठी गेलेले 34 पर्यटक कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले आहेत. नाहूर येथील दिनेश पानसरे, किशोरी कडवे हे दाम्पत्य अडकले आहे. तर मुंबई, जयपूर, राजस्थान, मोहाली, चेन्नई, केरळ, पंजाब, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर आदी राज्यांमधून पर्यटक तेथे गेले होते. या पर्यटकांपैकी काही पर्यटक सध्या बाली येथे सिनीमयक भागातील हॉटेल ग्रँडमस प्लसमध्ये वास्तव्याला असून अन्य काहीजण वेगवगेळया हॉटेलांमध्ये आहेत. आता पर्यटकांजवळील राखीव ठेवलेले पैसे संपत आले आहेत. त्यामुळे आता पुढे आणखी किती दिवस तेथे रहायचे ही चिंता त्या सगळयांसमोर असून ते तणावाखाली आहेत. 10 ते 20 मार्च या कालावधीत त्यांच्या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. हेही वाचा- कोल्हापुरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बायको, मुलासह 30 पेक्षा अधिक जणांच्या संपर्कात परत येण्यासाठी 20 मार्चचे तिकीट होते, परंतू ऐनवेळी त्यांना मलेशियन एअरलाइन्सचे विमान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आणि त्यामुळे पेच वाढला. तरीही त्यांनी सतर्कता दाखवत लगेच सुमारे 65 हजार रुपये खर्च करुन एअर इंडियाचे 22 मार्च रोजी दोन तिकीट काढली. मात्र तेदेखिल रद्द झाले. आधीच भारतात परत कसे जायचे आणि विमान तिकिटांसाठी खर्च झालेले पैसे परत मिळतील की नाही? याचीही शाश्वती कोणालाही नाही. त्यामुळे ते अडकल्याच्या भावनेने महिला पर्यटकांना रडू कोसळले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या