JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात चार रुग्ण निरीक्षणाखाली, एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात चार रुग्ण निरीक्षणाखाली, एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह

मुंबई,6 फेब्रुवारी: कोरोना व्हायरसची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयात निरीक्षणाखाली सध्या चार प्रवासी दाखल आहेत. त्यातील तीन नागपुरात तर एक मुंबईत दाखल आहे. नागपूर येथे दाखल असलेल्या तिघांपैकी एकाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत राज्यात 22 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 14 हजार 376 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे.

जाहिरात

भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांवर उपचार करण्यात आले होते आणि त्यांची प्रकृती सुधारली होती. आता दोन रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,6 फेब्रुवारी: कोरोना व्हायरसची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयात निरीक्षणाखाली सध्या चार प्रवासी दाखल आहेत. त्यातील तीन नागपुरात तर एक मुंबईत दाखल आहे. नागपूर येथे दाखल असलेल्या तिघांपैकी एकाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत राज्यात 22 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 14 हजार 376 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 129 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले 22 प्रवासी आजपर्यंत कोरोनासाठी निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही (पुणे) यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या राज्यात 4 प्रवासी भरती आहेत. यापैकी 3 जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे तर एक जण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे भरती आहे. नागपूर येथे भरती असणाऱ्या 3 पैकी एका प्रवाशाचा नमुना निगेटिव्ह आला. इतर अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. बाधित भागातून येणा-या प्रवाशांचा पाठपुरावा 14 दिवसांकरता करण्यात येत आहे. राज्यात आलेल्या 129 प्रवाशांपैकी 54 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. जगाला कोरोनाचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचाच व्हायरसनं घेतला बळी दरम्यान, चीनमधून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलंय. भारतासह जगभरातील डझनभर देशात कोरोना पसरला असून आत्तापर्यंत 563 जणांचा या व्हायरसनं जीव घेतलाय. तर 28 हजारांपेक्षा जास्त लोकांना व्हायरसची बाधा झालीय. भारतातही तीन रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. त्यातच ज्या डॉक्टरने जगाला सर्वात पहिल्यांदा कोरोना व्हायरसच्या संभाव्य प्रकोपाबद्दल सावध केलं होतं. त्यांनाच कोरोना व्हायरनं आपली शिकार बनवलं. चीनी डॉक्टर ली वेनलियांग यांनी स्थानिक प्रशासनाला कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दल इशारा दिला होता. पण त्यांच्या इशारा इशारा कुणी गांभीर्यानं घेतला नाही. स्थानिक पोलिसांनी तर त्यांना फटकारलं. पण गुरुवारी वुहानमध्ये डॉक्‍टर ली वेनलियांग यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या