JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनाग्रस्त महिलेनं दिला बाळाला जन्म, कुशीत घेता येत नाही पण VIDEO कॉलवर चिमुकल्याला बघते आई

कोरोनाग्रस्त महिलेनं दिला बाळाला जन्म, कुशीत घेता येत नाही पण VIDEO कॉलवर चिमुकल्याला बघते आई

बाळाची आई कोरोना पॉझिटिव्ह आहे. सध्या ती आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे आई चिमुकल्याला व्हिडिओ कॉलवरून पाहते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 एप्रिल : कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र राज्यात टेस्टचे प्रमाणही जास्त असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या महिलेनं एका निरोगी बाळाला जन्म दिल्याचंही समोर आलं आहे. औरंगाबाद इथल्या सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाला त्याच्या आईसोबत व्हिडिओ कॉलवरून भेट घडवून दिली जाते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाळाची आई कोरोना पॉझिटिव्ह आहे. सध्या ती आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे बाळाची आणि आईची भेट व्हिडिओ कॉलमधून होते. बाळ पूर्णपणे सुरक्षित असून आहे. बाळही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. याबद्दल डॉक्टरांनी म्हटलं की, बाळाचा जन्म झाल्यांनंतर त्याला आईकडे दिलं जातं. पण कोरोनामुळे या प्रकरणात ते शक्य नाही. बाळाची आणि आईची भेट व्हावी यासाठी डॉक्टरांनी व्हिडिओ कॉलचा मार्ग अवलंबला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त महिलांनी बाळाला जन्म दिल्याच्या आणखी काही घटनाही घडल्या आहेत. मुंबईतील नानावटी रुग्णालयातही दोन कोरोनाग्रस्त महिलांनी बाळाला जन्म दिला आहे. त्या नवजात बालकांनासुद्धा त्यांच्या आईपासून दूर ठेवण्यात आलं आहे. हे वाचा : UAE मधला अब्जाधीश भारतीय झाला कंगाल, एक अहवालाने 50 वर्षांच्या मेहनतीवर पाणी संपादन - सूरज यादव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या