नांदेड, 5 नोव्हेंबर : काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्या गाडीला नांदेडमध्ये अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अपघातात नसीम खान यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. भारत जोडो यात्रेसाठी नसीम खान हे हैद्राबादहून नांदेडला येत होते. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे टोल नाक्याजवळ समोरून येणाऱ्या गाडीने नसीम खान यांच्या गाडीला धडक दिली. दरम्यान बीलोलीमध्ये प्रथमोचार करून नसीम खान दुसऱ्या गाडीने नांदेडकडे रवाना झाले आहेत. बातमी अपडेट होत आहे.