JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'ज्यावेळी तुमचं घर फुटेल तेव्हा...' बावनकुळेंच्या टीकेवर नाना पटोलेंचं उत्तर; बंडखोरांनाही इशारा

'ज्यावेळी तुमचं घर फुटेल तेव्हा...' बावनकुळेंच्या टीकेवर नाना पटोलेंचं उत्तर; बंडखोरांनाही इशारा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जशास तसे उत्तर दिलं आहे.

जाहिरात

बावनकुळेंच्या टीकेवर नाना पटोलेंचं उत्तर

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भंडारा, 13 जानेवारी : काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीतील युवा नेता सत्यजित तांबे यांनी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरुन आता काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. इतर पक्षांवर टीका करण्यापेक्षा स्वतः मध्ये सुधारणा करा नाही तर नाशिक सारख्या घटना अनेक ठिकाणी घडतील, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मारला होता. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतित्युत्तर दिलं आहे. नाना पटोले भंडारा येथे आले असता त्यावेळी त्यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भीतीचे वातावरण निर्माण करुन लोकांची घरं फोडतायेत : नाना पटोले राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करून लोकांची घर फोडणारी हे लोक आनंद व्यक्त करत आहेत. ज्यावेळी त्यांचं घर फुटेल त्यावेळी यांना कळेल, वेळ आल्यावर त्यांना जनतेला उत्तर द्यावे लागेल, असं प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे. पुढे ते म्हणाले, भाजपचे धोरण काँग्रेसच्या लोकांना भीती दाखवून आपल्या पक्षात घेत आहे. आज त्यांचा काळ आहे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. काँग्रेसला ज्या लोकांनी आज धोका दिला आहे. काँग्रेसने इतकं सारं देऊनही या लोकांनी धोका दिला आहे. काँग्रेस विचाराच्या लोकांनीही आज खुणगाठ बांधलेली आहे. याचे उत्तर आम्ही जनतेच्या दरबारातून देऊ, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. वाचा - ठाकरे गटाची पंकजा मुंडे यांना खुली ऑफर; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठल्याही परिस्थिती.. काय म्हणाले होते बावनकुळे? काँग्रेसला स्वत:चीच माणसे सांभाळता येत नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यावर टीका करतात. त्यांनी प्रथम आपले घर वाचवावे. त्यांचे घर कच्चे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केली.  बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशातील आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटते की काँग्रेस डुबते जहाज आहे. त्यामुळे त्या जहाजावर कोणीही बसायला तयार नाही. अमित देशमुख यांनी मी ज्या घरात आहे त्याच घरात राहणार आहे असे सांगितले असले तरी काळ ठरवेल. जर तरला अर्थ नाही. 2024 मध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाला उमेदवार सुद्धा मिळणार नाही. सत्यजीत तांबे यांनी अजूनही आम्हाला पाठिंबा मागितला नाही. आमच्याकडे आले तर आमच्या राज्य आणि केंद्रीय संसदीय मंडळाकडे हा विषय जाईल आणि ते निर्णय घेतील. आमच्या तीन उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र, त्यांना एबी फॉर्म दिले नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

सत्यजित तांबे यांचं काम चांगलं : देवेंद्र फडणवीस “आमचं धोरण बावनकुळे यांनी सांगितलं आहे. सत्यजित तांबे यांचं काम चांगलं आहे. पण कोणताही निर्णय धोरणात्मक घ्यायचा असतो. आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण सगळेच नेते तिथं होते. त्यामुळं हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये. योग्यवेळी सगळं समोर येईल.”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आम्ही कोणता उमेदवार द्यायची यावर चर्चा सुरू होती. राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी अशी चर्चा होती. पण, ऐनवेळी उमेदवारी द्यायचं नाही असं ठरलं, असंही फडवणीस यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या