काही दिवसांपूर्वी अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
मुंबई, 17 ऑगस्ट : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर इन्कमिंग सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांची भेट घेतली होती. आता अस्लम शेख (aslam shaikh) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची विधान भवनातील कार्यालयात जाऊन भेट घेतली. ही भेट कशासाठी घेण्यात आली होती, याचे कारण अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. भाजप नेते मोहित कंबोज आणि अस्लम शेख हे एकत्र देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या सागर या बंगल्यावर एकाच कारने गेले होते. विशेष म्हणजे, किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर थेट 200 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. ( आता संरपचाची निवड जनतेतूनच, विधानसभेत विधेयक मंजूर, मविआला दणका ) “अनिल परबांनी दापोलीत समुद्रात जसं रिसॉर्ट बांधलं तसंच मढमध्ये कोरोना काळात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानं मोठमोठी बांधकामे उभी राहिली आहेत. समुद्रात सर्व नियमांचं उल्लंघन करुन अशी बांधकामे केली जात आहेत. जवळपास 200 कोटींचा घोटाळा या ठिकाणी आहे. थेट समुद्रात स्टुडिओ आणि इतर बांधकामे केली जात आहेत”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे अस्लम शेख यांच्या पाठिमागे देखील ईडीचा ससेमिरा लागणार की काय? असा प्रश्न उपस्थित होता. (‘50 खोके…एकदम ओक्के’ विरोधकांच्या घोषणा अन् शिंदेंची एंट्री, शंभूराजे म्हणाले, पाहिजे का?) हे आरोप झाल्यानंतर मढ मार्वेच्या 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळ्या प्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस पाठवण्यात आली होती. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने ही नोटीस जारी केली. याप्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आलं आहे.