JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रात 15 ते 20 एप्रिलमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका, मुख्यमंत्री घेणार मोठा निर्णय

महाराष्ट्रात 15 ते 20 एप्रिलमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका, मुख्यमंत्री घेणार मोठा निर्णय

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनां सदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासोबत व्हिडीयो काँफरसिंगद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीत लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनां सदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात 15 एप्रिल ते 20 एप्रिल या काळात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण मोठ्या संख्येने बाहेर येतील अशी तज्ञांची माहिती आहे. त्यामुळे या दिवसांत शहरी भागात लाँकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण महाराष्ट्रात लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यासंदर्भातही चर्चा होणार आहे. केंद्राच्या पातळीवरही हालचाली सुरू देशभरातील लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने काढण्यात येईल, अशी माहिती आहे. सरकार काही आर्थिक क्रिया सुरू करण्यासाठी सूट देण्याच्या विचारात असल्याने लॉकडाऊन 2.0 कडे संपूर्ण लॉकडाउन म्हणून पाहिले जाऊ शकत नाही, असे सरकारी सूत्रांनी सोमवारी सांगितले. हेही वाचा- पुण्यातले सगळे खासगी डॉक्टर आता सरकारच्या आधीन, करावे लागणार कोरोना रुग्णांवर उपचार अंतर्गत सरकारी कंपन्या व कारखान्यांमध्ये काम सुरू करण्यास परवानगी देऊ शकते. त्यांना टाउनशिप झोनमध्ये विभागले जाईल. याखेरीज सरकारने सर्व केंद्रीय मंत्र्यांना सोमवारी कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले आहे. सर्व मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांनी संबंधित विभागातील सहसचिव व त्यावरील पदाच्या अधिकाऱ्यांनीही सोमवारपासून ड्युटीवर येण्यास सांगावे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या